मुंबई -येथे मंगळवारी 846 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 107 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 68 हजार 481 वर पोहचला आहे. तसेच मृतांचा आकडा 3 हजार 842 वर पोहचला आहे. मुंबईमधून आतापर्यंत 34 हजार 576 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत याठिकाणी सध्या 30 हजार 063 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
मंगळवारी 107 बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 42 मृत्यू गेल्या 48 तासांमधील आहेत. तर 65 मृत्यू 48 तासांपूर्वीचे आहेत. 107 मृत्यूपैकी 79 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 64 पुरुष आणि 43 महिला रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये 7 जणांचे वय 40 वर्षाखाली होते, 60 जणांचे वय 60 वर्षांवर तर 40 जणांचे वय 40 ते 60 वर्षादरम्यान होते.