मुंबई - आज (दि. 26 ऑक्टोबर) मुंबईत कोरोनाच्या नव्या 804 रुग्णांची नोंद झाली असून 37 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या सोळा दिवसात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 69 वरून 132 दिवस इतका वाढल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
मुंबईत आज (सोमवार) कोरोनाचे 804 नवे रुग्ण आढळून आले असून 37 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 32 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 23 पुरुष तर 14 महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 52 हजार 087 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 10 हजार 99 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आज 1 हजार 293 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 21 हजार 458 वर गेला आहे. सध्या मुंबईत 19 हजार 35 सक्रिय रुग्ण आहेत.