महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai High Court: वडाळा पोलीस कोठडीत आरोपी मृत्यू प्रकरणातील दोषी 8 पोलीस अधिकाऱ्यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव - Wadala police custody

Mumbai High Court: मुंबईतील वडाळा पोलीस कोठडीत Wadala Police Station in Mumbai मृत्यू झालेल्या आरोपी अग्नेलो वल्दारिस हत्येप्रकरणी वडाळा रेल्वे पोलीस Wadala Railway Police ठाण्यातील 8 पोलिसांना दोषी ठरविण्यात आले आहे.

Mumbai High Court
Mumbai High Court

By

Published : Nov 4, 2022, 10:24 PM IST

मुंबई:मुंबईतील वडाळा पोलीस कोठडीत Wadala Police Station in Mumbai मृत्यू झालेल्या आरोपी अग्नेलो वल्दारिस हत्येप्रकरणी वडाळा रेल्वे पोलीस Wadala Railway Police ठाण्यातील 8 पोलिसांना दोषी ठरविण्यात आले आहे. विशेष सीबीआय न्यायालयाच्या CBI Court त्या निर्णयाला आरोपींनी आज उच्च न्यायालयात Mumbai High Court आव्हान दिले असून त्यावर लवकरच सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.

तपास सीबीआयकडे सुपूर्द वडाळा रेल्वे पोलिस ठाण्यात 5 वर्षांपूर्वी कोठडीतील मृत्यू प्रकरणात हत्येचा आरोप ठेवलेल्या 8 पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. यापूर्वी न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सुपूर्द केल्यानंतर सीबीआयने या प्रकरणात 8 पोलिसांवर ठपका ठेवत त्यांच्यावर हत्येचा आरोप ठेवला आहे. याविरोधात आरोपींनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे.

कुटुंबीयांची याचिका मंजूर सीबीआय न्यायालयाचे विशेष न्यायाधीश जयश्री आर. पुलाटे यांनी 17 सप्टेंबर रोजी या प्रकरणातील आठही आरोपी पोलिसांविरोधात भादंवि कलम 302 नुसार गुन्हा दाखल करून हत्येचा आरोप निश्चित करण्यात यावेत, अशी वल्दारिसच्या कुटुंबीयांची याचिका मंजूर केली आहे. साक्षीदारांनी नोंदवलेले जबाब अग्नेलो शवविच्छेदन अहवाल स्टेशन डायरीतील नोंदी आणि गुन्ह्याचा पंचनामा इत्यादी संपूर्ण सामग्रीच्या आधारावर आयपीसीच्या कलम 302, 295 अ अंतर्गत आरोप निश्चित केले जाऊ शकतात, असे प्रथमदर्शनी पुराव्यावरून सिद्ध होत असल्याचे न्यायालयाने आपल्या स्पष्ट केले आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी अपघाती मृत्यूचे प्रकरण जितेंद्र रामनारायण राठोड, अर्चना मारुती पुजारी, शत्रुगण तोंडसे, तुषार खैरनार, रवींद्र माने, सुरेश माने, विकास सुर्यवंशी आणि सत्यजित कांबळे अशी 8 आरोपींची नावे आहेत. आरोपी पोलीस अधिकाऱ्यांनी अपघाती मृत्यूचे प्रकरण असून वल्दारिसच्या कुटुंबियांनी केलेला हत्येचा दावा चुकीचा आणि अयोग्य असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला होता. मात्र न्यायालयाने त्यांची विनंती फेटाळून लावली होती. त्याविरोधात त्यांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

काय आहे प्रकरण4 एप्रिल 2014 रोजी 25 वर्षाच्या अग्नेलो वल्दारिस या युवकाला मोबाईल चोरीचा गुन्ह्यातंर्गंत अटक करण्यात आली होती. मात्र पोलीस कोठडीत असताना त्याचा संशयास्पद मृत्यु झाला होता. वल्दारीसची पोलीस कोठडीत मानसिक व शारीरिक छळवणूक केली, असा दावा त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आला. तर दंडाधिकारी न्यायालयात नेत असताना त्याने पोलिसांच्या हातून निसटण्याचा प्रयत्न केला आहे.

याचिका दाखल या प्रयत्नात तो बाजूने भरधाव जात असलेल्या लोकलला धडकला आणि त्याचा मृत्यू झाला, असा दावा पोलिसांकडून कऱण्यात आला होता. त्याविरोधात अग्नेलोच्या वडिलांनी न्यायालयात पोलिसांविरोधात याचिका दाखल करून दोषी पोलिसांविरोधात भादंवि कलम 302 नुसार गुन्हा दाखल करून नुकसान भरपाई देण्याची मागणी याचिकेतून केली होती. जीआरपीशी संलग्न संबंधित कर्मचार्‍यांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला. हे प्रकरण केंद्रीय तपास यंत्रणेकडे हस्तांतरित करण्याची मागणी अग्नेलो कुटुंबाने केली होती. त्याची दखल घेत उच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग केले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details