मुंबईशिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरीकरण शिवसेनेत उभी ( rebel in Shiv sena ) फूट पाडली. त्यानंतर नेमकी शिवसेना कोणाची याबाबतची कायदेशीर लढाई सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापिठासमोर आणि केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुरू आहे. यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना कार्यकर्ते, नेते, पदाधिकाऱ्यांच्या शपथपत्र सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार दोन्ही गटांकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शपथपत्र दाखल करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ( Shiv Sena submitted to Central Election Commission ) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून जवळपास साडेआठ लाख शपथपत्र दाखल करण्यात आली आहेत. ही साडेआठ लाख शपथपत्र दोन ट्रक मधून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली. एकनाथ शिंदे गटाकडूनदेखील याआधी निवडणूक आयोगाकडे शपथपत्र दाखल करण्यात आली आहेत. त्याची संख्या जवळपास अडीच लाखपर्यंत असल्याचा सांगण्यात येत आहे.