Action Of Anti-Drug Squad : 8 लाख 20 हजाराचे ड्रग्ज, नायजेरियन महिलेसह दोघांना अटक - 8 lakh 20 thousand worth of drugs
मुंबईत अमली पदार्थ विरोधी पथकाच्या मोठ्या कारवाया (Action Of Anti-Drug Squad) सुरू आहेत. मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलच्या (Mumbai Anti Narcotics Cell) घाटकोपर युनिटने 2 अंमली पदार्थ विक्रेत्यांना अटक केली आहे. यात एक नायजेरियन महिला ड्रग्ज डीलर (Nigerian woman and two others arrested) आहे. त्यांच्याकडून 82 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 8 लाख 20 हजार रुपये (8 lakh 20 thousand worth of drugs) आहे.
मुंबई:अमली पदार्थ घाटकोपर युनिटला गुप्त मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांकडून सापळा रचण्यात आला आणि ड्रग्ज डीलर ताब्यात घेण्यात आले आहे आरोपींकडून चौकशीनंतर अफजल सय्यद याचे नाव समोर आले आहे. अधिक तपासात मालाडमध्ये एका 39 वर्षीय व्यक्तीकडून 52 ग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला. नडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नोंदवून एएनसीने पुढील तपास सुरू केला आहे. गोरेगाव येथील दूधसागर सोसायटी बस स्टॉपजवळ 28 वर्षीय आफ्रिकन महिला ड्रग्जची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती एएनसी अधिकाऱ्याला मिळाली होती. त्यानंतर सापळा रचून पेडलरला अटक करण्यात आली.