मुंबई: सांताक्रुज येथील गजझर बांधमध्ये लक्षद्विप नावाचे एक प्रसिद्ध बार आणि रेस्ट्रॉरंट आहे. या बारला आर्केस्ट्राचा परवाना असताना तिथे डान्स बार सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी राजेंद्र काणे यांच्यासह महेश बोळकोटगी, ज्योती हिबारे, गुजाळ व अन्य पोलीस पथकाने छापा टाकला होता. यावेळी बारच्या पहिल्या मजल्यावर काही बारबाला तिथे उपस्थित ग्राहकांशी अश्लील चाळे करताना दिसून आले.
अठरा जणांना घेतले ताब्यात : त्यानंतर पोलिसांनी बारचा चालक, मॅनेजर, कॅशिअर, सहा वेटर आणि नऊ ग्राहक अशा अठराजणांना ताब्यात घेतले होते. यावेळी तिथे असलेल्या तेरा बारगर्लची सुटका करण्यात आली. तर या अठराजणां विरुद्ध भादवीसह अन्य कलमांतर्गत कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत पोलिसांनी काही कॅशसहीत इतर साहित्य जप्त केले आहे.आज पहाटेपर्यंत या ऑर्केस्ट्रा बारवर कारवाई सुरू होती.
गिऱ्हाईकांसमोर अश्लील नृत्य: या बारमध्ये प्रवेश केला असता महिला ऑकेस्ट्रा स्टेजच्या खाली गिऱ्हाईकांसमोर उत्थान कपडयाच्या पेहराव्यामध्ये अश्लील नृत्य करताना मिळुन आले. त्यांना नमुद आस्थापनेचे चालक, बार मॅनेजर, कॅशियर वेटर, हे अश्लील नृत्यास प्रोत्साहीत करत असताना दिसुन आले. म्हणुन यातील फिर्यादी नितीश हरिशचंद्र ठाकूर, वय ३७ वर्ष, यांनी आस्थापनेचे १ बार चालक, १ बार मॅनेजर, १ बार कॅशियर, ६ बार वेटर, ०९ ग्राहक यांचे विरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून सांताका पोलीस ठाण्यात कलम १८८, ३४ भादविसह कलम ३,८ (१), ८(२), ८(४), महाराष्ट्र हॉटेल उपहारगृह आणि मदयपान कक्ष (बार रूम) यामधील अश्लील नृत्यावर प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम सन २०१६ अन्वये दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत रोख रक्कम रुपये १६,८००/- ऑक्सफेबल (किमत अंदाजे ५००/-) १ ॲम्प्लिीफायर, (किमत अंदाजे २३०००/-)१, स्पीकर (किमंत अंदाजे ८०००/-), असा मुद्देमाल तपासकामी जप्त करण्यात आला आहे. तसेच कारवाईमध्ये १ बार चालक, १ बार मॅनेजर, १ कॅशियर, ६ वेटर, ९ ग्राहक यांना ताब्यात घेवून कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा:Police Raid On Kashish Bar अश्लील नृत्य सुरू असतानाच कशिश बारमध्ये पोलिसांची एन्ट्री २८ बारबाला ताब्यात