महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत कोरोनाचा ७वा रुग्ण दगावला - 7 th patient died mumbai corona

रुग्णालयात दाखल करण्याच्या ४ दिवस आधीपासूनच महिलेला श्वसनाचा आणि छातीत दुखण्याचा त्रास होत होता. त्यानंतर, तिला पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे चाचणी अहवालात स्पष्ट झाले होते. मात्र, काल तिचा मृत्यू झाला.

corona mumbai
प्रतिकात्मक

By

Published : Mar 29, 2020, 3:55 PM IST

मुंबई- जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूमुळे शहर परिसरात ७वा मृत्यू झाला आहे. रुग्ण ४० वर्षीय महिला असून तिला काल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, या महिला रुग्णाचा काल मृत्यू झाला.

रुग्णालयात दाखल करण्याच्या ४ दिवस आधीपासूनच महिलेला श्वसनाचा आणि छातीत दुखण्याचा त्रास होत होता. त्यानंतर, तिला पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे चाचणी अहवालात स्पष्ट झाले होते. मात्र, काल तिचा मृत्यू झाला. दरम्यान, शहर परिसरातील कोरोनाचा हा ७वा मृत्यू आहे. आतापर्यंत शहरातील ५ तर शहरा बाहेरील २ अशा ७ जणांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा-अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांसाठी ऑनलाईन ई-पासची सुविधा उपलब्ध

ABOUT THE AUTHOR

...view details