महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत गेल्या २४ तासात ७९ नवे रुग्ण, एकूण रुग्णांचा आकडा ७७५ वर

मुंबईमधील रुग्णांचा एकूण आकडा ७७५ वर पोहचला असून, मृतांचा आकडा ५४ वर पोहचला आहे. आतापर्यंत ६५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

covid 19 patient found in mumbai
मुंबईत गेल्या २४ तासात ७९ नवे रुग्ण, एकूण रुग्णांचा आकडा ७७५ वर

By

Published : Apr 9, 2020, 7:48 PM IST

मुंबई - मुंबई परिसरात गेल्या २४ तासात कोरोनाचे ७९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ९ जणांचा मृत्यू झाला असून, ६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे मुंबईमधील रुग्णांचा एकूण आकडा ७७५ वर पोहचला असून, मृतांचा आकडा ५४ वर पोहचला आहे. आतापर्यंत ६५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत गेल्या २४ तासात ज्या ९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्या सर्वांना दीर्घकालीन आजार होता असे पालिकेच्या आरोग्य विभागाने कळविले आहे.

मुंबईत आतापर्यंत १५ लाख पेक्षा अधिक लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामधून कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या जवळच्या २८०६ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेऊन चाचणी करण्यात आली आहे. तसेच घरोघरी जाऊन १५०० नमुने चाचणी साठी गोळा करण्यात आले आहे. पालिकेने घोषित केलेल्या ३८१ प्रतिबंधित क्षेत्रामध्ये ५ एप्रिलपासून ४० क्लिनिकच्या माध्यमातून १५८८ पैकी ४४२ लोकांचे नमुने चाचणीसाठी घेण्यात आले आहेत अशी माहिती पालिकेने दिली आहे.

आज दिवसभरात केईएम रुग्णालयातील एका ४७ वर्षीय डॉक्टरला कोरणाची लागण झाली. सायन रुग्णालयात नर्सचे शिक्षण घेणाऱ्या एका २० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईमध्ये रुग्णांची संख्या सतत वाढत असल्याने ज्या विभागात रुग्ण आढळून येत आहेत असे ३८१ विभाग प्रतिबंधित विभाग म्हणजेच 'कंटेनमेंट' एरिया म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details