मुंबई- राज्यात ( Corona Update ) गुरुवारी (दि. 9) दिवसभरात 789 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 585 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा सरासरी दर 97.72 टक्के इतका असून मृत्यूदर 2.17 टक्के इतका आहे.
6 हजार 286 सक्रिय रुग्ण -
आज राज्यात 789 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 66 लाख 41 हजार 677 वर पोहोचला आहे. तर, आज 7 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 41 हजार 211 वर पोहोचला आहे. आज 585 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 90 हजार 305 वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.72 टक्के, तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 65 लाख 17 हजार 323 चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 09.98 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 74 हजार 353 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहे. 6 हजार 482 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
या विभागात सर्वाधिक रुग्ण -
मुंबई महापालिका - 219
ठाणे पालिका - 10
नवी मुंबई पालिका - 37
कल्याण डोबिवली पालिका - 11
वसई विरार पालिका - 16