महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Corona Update : गुरुवारी 789 नव्या रुग्णांची नोंद, 10 रुग्णांचा मृत्यू - mumbai corona news

मुंबईत बुधवारी कोरोनाचे 863 नवे रुग्ण आढळून आले होते. त्यामध्ये गुरुवारी किंचित घट होऊन 789 नवे रुग्ण आढळून आले असून 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

789 new corona patient found in mumbai
Mumbai Corona Update : गुरुवारी 789 नव्या रुग्णांची नोंद, 10 रुग्णांचा मृत्यू

By

Published : Jun 24, 2021, 9:24 PM IST

मुंबई - मुंबईत फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट आल्याने रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते त्यात गेल्या काही दिवसात घट झाली होती. गेले काही दिवस 500 च्या आसपास रुग्ण आढळून येत होते. मात्र त्यात किंचित वाढ पाहायला मिळली आहे. बुधवारी (दि.23 जून) 863 नवे रुग्ण आढळून आले होते. त्यामध्ये गुरुवारी (दि.24 जून) किंचित घट होऊन 789 नवे रुग्ण आढळून आले असून 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

रुग्ण दुपटीचा कालावधी 726 दिवसांवर

मुंबईत गुरुवारी 789 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाख 24 हजार 113 वर पोहचला आहे. आज 10 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 15 हजार 348 वर पोहचला आहे तर 542 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने बरे होण्याऱ्या रुग्णांची संख्या 6 लाख 91 हजार 670 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 14 हजार 810 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 726 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 11 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत तर 87 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज 35 हजार 764 तर आतापर्यंत एकूण 69 लाख 47 हजार 290 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

रुग्णसंख्येत चढउतार सुरूच
मुंबईत 1 मे ला 3908, 9 मे ला 2403, 10 मे ला 1794, 17 मे ला 1240, 25 मे ला 1037, 28 मे ला 929, 8 जून ला 673, 9 जून ला 788, 10 जून ला 660, 11 जून ला 696, 12 जून ला 733, 13 जून ला 700, 14 जून ला 529, 15 जूनला 575, 16 जून ला 830, 17 जून ला 666, 18 जून ला 762, 19 जून ला 696, 20 जून ला 733, 21 जून ला 521, 22 जून ला 570, 23 जून ला 863, 24 जून ला 789 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

हेही वाचा -अजित पवार, अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीचा प्रस्ताव कार्यकारणीत पारित

ABOUT THE AUTHOR

...view details