महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत कोरोनाचे 786 नवे रुग्ण, 13 रुग्णांचा मृत्यू

मुंबई रविवारी (दि. 6 डिसें.) 786 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून एकूण बाधितांचा आकडा 2 लाख 86 हजार 46 वर पोहोचला आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

By

Published : Dec 6, 2020, 10:06 PM IST

मुंबई - रविवारी (दि. 6 डिसेंबर) मुंबईत 786 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले असून 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 1 हजार 652 रुग्णांनी कोरोनामत आज (रविवार) मात केली आहे. मुंबईतील एकूण बाधितांचा आकडा 2 लाख 86 हजार 46 वर पोहोचला आहे.

मुंबई सध्या 13 हजार 132 सक्रिय रुग्ण

मुंबईत आज (रविवारी) कोरोनाचे 786 नवे रुग्ण आढळून आले असून 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 12 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 2 लाख 86 हजार 46 वर पोहोचला आहे. तर, एकूण मृतांचा आकडा 10 हजार 902 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 1652 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 61 हजार 191 वर गेला आहे. सध्या मुंबईत 13 हजार 132 सक्रिय रुग्ण आहेत.

रुग्ण दुप्पटीचा कालावधी 272 दिवसांवर

मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91 टक्क्यांवर पोहोचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 272, दिवस तर सरासरी दर 0.26 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 466 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 5 हजार 428 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 19 लाख 88 हजार 289 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

अशी वाढली रुग्णसंख्या

16 नोव्हेंबर - 409

17 नोव्हेंबर - 541

18 नोव्हेंबर - 871

19 नोव्हेंबर - 924

20 नोव्हेंबर - 1 हजार 31

21 नोव्हेंबर - 1 हजार 92

22 नोव्हेंबर - 1 हजार 135

23 नोव्हेंबर - 800

कमी नोंद झालेली रुग्णसंख्या

2 नोव्हेंबर 706 रुग्ण

3 नोव्हेंबर 746 रुग्ण

6 नोव्हेंबर 792 रुग्ण

7 नोव्हेंबर 576 रुग्ण

9 नोव्हेंबर 599 रुग्ण

10 नोव्हेंबर 535 रुग्ण

14 नोव्हेंबर 574 रुग्ण

16 नोव्हेंबर 409 रुग्ण

हेही वाचा -महाराष्ट्र कोरोना अपडेट; राज्यात ४,७५७ नवीन रुग्णांचे निदान

हेही वाचा -जगाला दिशा देणारा महामानव आपल्या राज्यात झाला याचा अभिमान - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ABOUT THE AUTHOR

...view details