मुंबई- कोरोना व्हायरसचे रुग्ण मुंबईत दिवसेंदिवस वाढत असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत विविध उपाययोजना प्रशासकीय स्तरावर केले जात आहेत. राज्यात लॉकडाऊनचा काळ 3 मेपर्यंत वाढवला गेला असून पोलिसांकडून कलम 144 शहरात लागू करण्यात आलेला आहे.
20 मार्च ते 17 एप्रिल यादरम्यान मुंबई शहरात विविध ठिकाणी संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांच्या संदर्भात 3832 प्रकरणात तब्बल 7576 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संचारबंदी नियमांचे उल्लंघन करणार्या 1101 फरार आरोपींचा पोलीस शोध घेत असून तब्बल 1616 आरोपींना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे , तर 4859 आरोपींना जामिनावर पोलिसांनी सोडून दिलेले आहे.