मुंबई- मुंबईत आज (सोमवारी) कोरोनाचे 753 नवे रुग्ण आढळून आले असून 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 29 हजार 479 वर पोहचला आहे. तर मृतांचा आकडा 7 हजार 170 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आज 833 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मुंबईत आतापर्यंत एकूण 1 लाख 4 हजार 301 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने सध्या 17 हजार 707 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईमधील रुग्ण बरे होण्याचा दर 80 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 86 दिवसांवर पोहचला आहे. जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूमुळे मुंबईत आज 40 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी 26 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 25 पुरुष तर 15 महिला रुग्ण आहेत.