महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत कोरोनाचे 748 नवे रुग्ण तर एकूण संख्या 11 हजार 967 वर - mumbai covid 19

मुंबईमध्ये कोरोना विषाणूच्या 748 रुग्णांचे नव्याने निदान झाले आहे. त्यापैकी गेल्या 24 तासात 542 रुग्णांचे निदान झाले आहे. तर 4 ते 6 मे दरम्यान खासगी लॅबमध्ये चाचण्या केलेल्या 206 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

covid 19 patient
मुंबईत कोरोनाचे 748 नवे रुग्ण तर एकूण संख्या 11 हजार 967 वर

By

Published : May 8, 2020, 11:24 PM IST

मुंबई - मुंबईत कोरोनाचे 748 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 11 हजार 967 वर पोहचला आहे. तर 25 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 462 झाला आहे. मुंबईमधून आतापर्यंत 2 हजार 589 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

मुंबईमध्ये कोरोना विषाणूच्या 748 रुग्णांचे नव्याने निदान झाले आहे. त्यापैकी गेल्या 24 तासात 542 रुग्णांचे निदान झाले आहे. तर 4 ते 6 मे दरम्यान खासगी लॅबमध्ये चाचण्या केलेल्या 206 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. मुंबईत 25 जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी 13 जणांना दिर्घकालीन आजार होते. 25 पैकी 13 पुरुष तर 12 महिला रुग्ण होते. मृत्यू झालेल्यांपैकी 3 जणांचे वय 40 वर्षाच्या खाली होते. 13 जणांचे वय 60 वर्षावर तर 9 जणांचे वय 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. मुंबईमधून 154 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत 2 हजार 589 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

धारावीत 808 रुग्ण -

कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत नव्या 25 रुग्णांचे निदान झाले आहे. धारावीत सध्या कोरोनाचे 808 रुग्ण असून, 26 जणांच्या मृत्यू झाला आहे. धारावीतून आतापर्यंत 222 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दादरमध्ये नव्या 21 रुग्णांचे निदान झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे दादरमध्ये कोरोनाचे 87 रुग्ण झाले असून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 17 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. माहीममध्ये नव्या 11 रुग्णांचे निदान झाल्याने रुग्णांचा आकडा 107 वर पोहचला असून 5 जणांचा मृत्यू झाला आहे तर 23 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details