महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत 726 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, 16 रुग्णांचा मृत्यू - Corona patients number Mumbai

मुंबईत काल कोरोनाचे 726 नवे रुग्ण आढळले, तर 16 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी 11 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 12 पुरुष व 4 महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 69 हजार 130 वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा 10 हजार 555 वर पोहोचला आहे.

Corona Review Mumbai
कोरोना आढावा मुंबई

By

Published : Nov 15, 2020, 1:22 AM IST

Updated : Nov 15, 2020, 1:29 AM IST

मुंबई - मुंबईत काल 726 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या महिनाभरात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 69 वरून 243 दिवस इतका वाढल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

10 हजार 77 सक्रिय रुग्ण -

मुंबईत काल कोरोनाचे 726 नवे रुग्ण आढळले, तर 16 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी 11 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 12 पुरुष व 4 महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 69 हजार 130 वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा 10 हजार 555 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आज 850 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 44 हजार 659 वर गेला आहे. सध्या मुंबईत 10 हजार 77 सक्रिय रुग्ण आहेत.

रुग्ण दुप्पटीचा कालावधी 243 दिवसांवर -

मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91 टक्क्यांवर पोहोचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 243 दिवस, तर सरासरी दर 0.29 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 482 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच, 5 हजार 676 इमारती व इमारतींच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 16 लाख 79 हजार 888 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

या आधी कमी नोंद झालेली रुग्णसंख्या -

7 नोव्हेंबर - 576 रुग्ण

2 नोव्हेंबर - 706 रुग्ण

3 नोव्हेंबर - 746 रुग्ण

6 नोव्हेंबर - 792 रुग्ण

9 नोव्हेंबर - 599 रुग्ण

10 नोव्हेंबर - 535 रुग्ण

हेही वाचा-कोरोनाचा फटका; राज्यातील पर्यटनस्थळांची काय आहे स्थिती? आढावा...

Last Updated : Nov 15, 2020, 1:29 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details