मुंबई:विरोधी पक्षांना काय करायची टीका त्यांनी करू द्यात, अजित पवार काय बोलले ते आम्ही पाहत नाही. Uday Samant Criticism विरोधी पक्षाचे कामच आहे टीका करणे, पण आम्ही जे काम करतोय. त्यात समृद्धी हायवे असेल किंवा शेतकऱ्यांना मदत असेल, ती या सरकारमार्फतच होणार आहे. त्यामुळे विरोधी पक्षाची टिकेला आम्ही फारसे गांभीर्याने घेत नाही. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत कोणी नाराजी नाही. आणि हे सरकार व्यवस्थितपणे काम करतंय, मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात योग्य पद्धतीने निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील.
Uday Samant Criticism: फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात 7 ते 8 आमदार-उदय सामंत - फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात
Uday Samant Criticism समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नागपुरात येत आहे. यानिमित्ताने महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न आणखी उफाळून येण्याची शक्यता आहे. कर्नाटकचा प्रश्न हा सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. आणि त्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री यांची भेट सुद्धा घेणं अपेक्षित आहे. अशा परिस्थितीमध्ये जोपर्यंत कोर्टामध्ये ही भूमिका पुढे येत नाही, तोपर्यंत कोणी टीका टिप्पणी करणे योग्य नाही.
त्यातच नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नागपुरात येत आहे. यानिमित्ताने महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न आणखी उफाळून येण्याची शक्यता आहे. कर्नाटकचा प्रश्न हा सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. आणि त्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री यांची भेट सुद्धा घेणं अपेक्षित आहे. अशा परिस्थितीमध्ये जोपर्यंत कोर्टामध्ये ही भूमिका पुढे येत नाही, तोपर्यंत कोणी टीका टिप्पणी करणे योग्य नाही.
नाट्य परिषदेची निवडणूक काही दिवसात होईल. कितीही नाट्य परिषदेमध्ये वाद असले, तरी निवडणुका होतील आणि त्या निवडणुका पार पडतील, अशी अपेक्षा आहे. सर्व विश्वस्तांना एकत्र करून वाद मिटवण्याचा प्रयत्न करू, असे उदय सामंत यांनी यावेळी सांगितले आहे. एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सगळे एकसंधपणे काम करत आहेत. कोणीही नाराज नाही. ज्यांना काम नाहीत ते अफवा पसरवत आहेत. उलट फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात 7 ते 8 आमदार आहेत.