महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चिंताजनक! 7 अधिकाऱ्यांसह 23 पोलिसांना कोरोनाची बाधा - corona news

कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्कतेने आपले कर्तव्य पार पाडत आहे. पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेताना दिसत आहेत. मात्र, या संकटाशी मुकाबला करताना दुर्देवाने ७ पोलीस अधिकारी आणि २३ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

7 police officers with 23 police constable tested as COVID 19 positive in Maharashtra
चिंताजनक! 7 अधिकाऱ्यांसह 23 पोलिसांना कोरोनाची बाधा

By

Published : Apr 18, 2020, 9:42 AM IST

मुंबई -राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये पोलीस प्रशासन अहोरात्र मेहनत घेऊन २४ तास कार्यरत आहेत. मात्र, या संकटाशी मुकाबला करताना दुर्देवाने ७ पोलीस अधिकारी आणि २३ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

राज्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन दरम्यान घडलेल्या घडामोंडीचा एकंदर आढावा -

राज्यात सर्वत्र सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात 22 मार्च 17 एप्रिल या कालावधीत राज्यात कलम 188 नुसार 49,756 गुन्हे दाखल झाले आहेत. तर 10,276 व्यक्तींना अटक करण्यात आली असून 32,424 वाहने जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांवर हल्ला होण्याच्या 102 घटनांची नोंद झाली आहे. तर, यात 162 जणांना अटक करण्यात आली आहे.

राज्यभरात लॉकडाऊनच्या कालावधीत पोलीस विभागाच्या १०० या नियंत्रण नंबरवर आता पर्यंत 70,307 फोन आले असून राज्यभरात पोलिसांनी क्वारंटाईनचा नियम मोडणाऱ्या 555 व्यक्तींना शोधून त्यांना पुन्हा विलगीकरण कक्षात पाठवले आहे.

लॉकडाऊन दरम्यान वाहतूक करणाऱ्या 1044 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर, परदेशी नागरिकांकडून व्हिसा उलंघनचे 15 गुन्हे राज्यभरात नोंदवन्यात आले आहेत.

या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी 1 कोटी 82 लाख 76 हजार 744 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details