महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Adar Poonawalla : आदर पुनावाला यांना एक कोटीचा गंडा घालणाऱ्या 7 जणांना वेगवेगळ्या राज्यांमधून अटक

सिरम इन्स्टिट्युटचे ( Serum Institute ) मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला ( Adar Poonawalla ) यांच्या नावाने बनावट व्हॉटसअॅप मेसेज पाठवून सिरम इन्स्टिट्युटला तब्बल १ कोटी रुपयांना गंडा घालणाऱ्या 07 जणांना वेगवेगळ्या राज्यातून बंडगार्डन पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Adar Poonawalla
Adar Poonawalla

By

Published : Nov 25, 2022, 5:25 PM IST

पुणे - सिरम इन्स्टिट्युटचे ( Serum Institute ) मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला ( Adar Poonawalla ) यांच्या नावाने बनावट व्हॉटसअॅप मेसेज पाठवून सिरम इन्स्टिट्युटला तब्बल १ कोटी रुपयांना गंडा घालणाऱ्या 07 जणांना वेगवेगळ्या राज्यातून बंडगार्डन पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. १) राजीव कुमार शिवजी प्रसाद रा. परेमनटोला, पोस्ट कंसदेवरा बंगरा, थाना महाराजगंज, जि. सिवान, राज्य बिहार २) चंद्रभुषण आनंद सिंग रा. छापमठीया, थाना निरंगज, तहसिल हाथिया, जिल्हा- गोपालगंज राज्य- बिहार. ३) कन्हैय्याकुमार संभु महंतो रा. ग्राम जिगरचा, थाना महाराजगंज, जिल्हा सिवान, राज्य बिहार, ४) रविंद्रकुमार हुबनाथ पटेल रा. ग्राम गहरपूर, पोष्ट हाथीबाजार, तहसिल वाराणसी, जिल्हा वाराणसी, राज्य उत्तरप्रदेश, ५) रावी कौशलप्रसाद गुप्ता रा. ग्राम देवा, पोस्ट चिंगवाह, तहसिल कुसमी चियालाह गोपादबनस मंजुली सिध्दी, मध्यप्रदेश, ६) यासीर नाझीम खान वय २७ वर्षे रा. गुळागुडीका नाका, एकतापुरी कॉलनी, ग्वाल्हेर मध्यप्रदेश राज्य, ७) प्रसाद सत्यनारायण लोवुडू रा. हाऊस नं. १, ७८/२, लाईन कोथुरु रेगुपालेम, पोस्ट येलामंचेली विशाखापट्टन्नमट आंध्रप्रदेश राज्य यांना अटक करण्यात आली.

आदर पुनावाला यांना एक कोटीचा गंडा घालणाऱ्या 7 जणांना वेगवेगळ्या राज्यांमधून अटक

13 लाख रुपये गोठवले -आत्ता पर्यंत 13 लाख रुपये गोठवले आहे. सागर कित्तुर हे सिरम इन्स्टिट्युटमध्ये फायनान्स व्यवस्थापक आहेत, तर सतीश देशपांडे हे कंपनीचे संचालक आहेत. आदर पूनावाला हे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. आदर पूनावाला यांच्या नंबरवरून बनावट व्हॉटस अॅप मेसेज देशपांडे यांना आले. त्यात काही बँक खात्यांचे नंबर देऊन त्यावर तात्काळ पैसे पाठविण्यास सांगितले. हे मेसेज खरे वाटल्याने कंपनीचे खात्यावरुन विविध बँक खात्यावर एकूण १ कोटी १ लाख १ हजार ५५४ रुपये पाठविण्यात आले. त्यानंतर कंपनीची फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांकडे फिर्याद देण्यात आली होती.

७ ते ८ सप्टेंबर दरम्यान घडला होता - गेल्या तीन महिन्यांपासून पोलिसांकडून याचा तपास सुरू होता. तीन महिन्यांनंतर बिहार येथून सुरवातीला चौघांना अटक करण्यात आली, आत्ता इतर राज्यातून 3 जणांना अटक करण्यात आली. देशभरातील अनेक दिग्गज राजकीय मंडळी यांच्यासह उद्योजकांना फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. या गुन्हयातील आरोपी हे बिहार, आसाम, ओरीसा, कोलकता पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश इत्यादी राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे.

सात जणांना अटक -गुन्हयातील आरोपीतांचे खात्यावर सिरम कंपनीचे खात्यावरुन प्राप्त झालेल्या रकमा त्यांचे ओळखीचे इतर आरोपीना पाठविल्याचे दिसुन आले आहे. ज्या खात्यावर सिरस कंपनीचे पैसे वर्ग झाले ती बँक खाती तसेच संबंधीत बँकेतुन इतर आरोपीना पाठविण्यात आलेल्या सर्व बँक खाती गोठविण्यात आली. तपासामध्ये आरोपी प्रसाद लोवडू हा स्वॉफटवेअर इंजिनीयर असुन राबी गुप्ता हा विज्ञान शाखेचा पदवीधर आहे. तो व्यवसायीक बँकेमध्ये नोकरी करीत असल्याचे दिसुन आलेले आहे. हा गुन्हा गुंतागुंतीचा असून या गुन्हयात परराज्यातील एकुण ०७ आरोपी निष्पन्न करुन त्यांना अटक केले आहे. आजुनही याबाबत सायबर तज्ञांच्या मदतीने गुन्हयाचा तपास करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details