मुंबई- जगभरात आढळून आलेल्या ओमायक्रॉनचे रुग्ण ( Omicron Cases ) आढळून येत आहेत. राज्यात डोंबिवली, मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे आतापर्यंत ओमायक्रॉनचे १७ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ७ रुग्णांना डिस्चार्ज ( Omicron Patient Discharge ) देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी भीती बाळगू नये, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
७ ओमायक्रॉनमुक्त रुग्णांना डिस्चार्ज -
राज्यात अति जोखमीच्या देशातून १० हजार ६८५ तर इतर देशातून ५८ हजार ३७२, असे एकूण ६९ हजार ७२ प्रवासी राज्यात आले. त्यापैकी अति जोखमेच्या देशातील १० हजार ६८५ तर इतर देशातील १ हजार ३७९, अशा एकूण १२ हजार ६४ प्रवाशांच्या आरटीपीसीआर ( RTPCR Test ) चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामधून अति जोखमीच्या देशातून आलेले २१ तर इतर देशातून आलेले ५, अशा एकूण २६ प्रवाशांचे नमुने जिनोम सिक्वेनसिंग ( Genome Sequencing ) चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी १७ प्रवाशांना ओमायक्रॉन विषाणूची ( Omicron Variant ) बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यापैकी ७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. १ नोव्हेंबरपासून विमानतळावर आलेल्या व पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या १०७ जणांचे नमुने जिनोमिक सिक्वेनसिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी ५१ जणांचा अहवाल अद्याप बाकी आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.