मुंबई- मुंबईत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्याविरोधात लढण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. या आजाराविरोधात लढण्यासाठी निधीची कमतरता भासू नये म्हणून महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थिती मुख्यमंत्र्यांकडे विविध सामाजिक संघटनांनी तसेच नगरसेवक अनिल कोकीळ यांनी ७ लाख ६७ हजार रुपयांचा निधी सुपूर्द केला आहे.
कोरोना संकट: 'यांनी' केली मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ७ लाखांची मदत - मख्यमंत्री सहाय्यता निधी
कोरोना आजाराविरोधात लढण्यासाठी निधीची कमतरता भासू नये म्हणून विविध सामाजिक संघटनांनी तसेच नगरसेवक अनिल कोकीळ यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थिती मुख्यमंत्र्यांकडे ७ लाख ६७ हजार रुपयांचा निधी सुपूर्द केला आहे.
हेही वाचा-मुंबईत कोरोनाचे आज 417 नवे रुग्ण; 20 जणांचा मृत्यू तर एकूण रुग्ण संख्या 6874 वर
मुंबईत कोरोनाचा प्रसार अनेक विभागात मोठ्या प्रमाणात होत आहे. या विषाणूच्या आजारावर मात करण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. रुग्णाला क्वारंटाईन करण्यापासून आयसोलेशनमध्ये उपचार केले जात आहेत. एखाद्या विभागात रुग्ण आढळून आल्यास त्या विभागात घराघरात जाऊन नवे कोणी रुग्ण आहेत का याची तपासणी केली जात आहे. रुग्णांना विविध सुविधा देताना उद्योगपतींचे सहकार्याने आणि सीएसआर फंडाचाही वापर केला जात आहे.
मुंबईमधील रुग्णांना सोयी सुविधा देताना निधी कमी पडू नये म्हणून सामाजिक संस्था आणि नगरसेवकांनी पुढाकार घेण्यास सुरुवात केली आहे. इंदू कॉर्पोरेशन ५ लाख, नगरसेवक अनिल कोकीळ १ लाख, ओम कबड्डी प्रभोदिनी ८१ हजार, ओम पॅकेर्स फाउंडेशन ३१ हजार १११ रुपये, नानाभाई फाउंडेशन ३० हाजर १ रुपये आणि बाळ गोपाळ नावरात्रोत्स मंडळ २५ हजार यांनी मिळून एकूण ७ लाख ६७ हजार १११ रुपये इतका निधी जमा करुन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिला आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हा निधी सुपूर्द केला आहे.