सोलापूर विद्यापीठाजवळ तेलंगणाच्या बसला भीषण अपघात; ११ जखमी, ५ गंभीर
सोलापूर - शहरातील सोलापूर विद्यापीठाजवळ तेलंगणाच्या बसला भीषण अपघात झाल्याची घटना घडली. सोलापूर-पुणे महामार्गावर ही घटना घडली. यामध्ये ११ जण जखमी झाले असून, ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. वाचा सविस्तर -
घातपाताचा प्रयत्न नाही.., शालिमार एक्सप्रेसमध्ये जिलेटीन कांड्या ठेवणाऱ्या संशयितास अटक
मुंबई - लोकमान्य टिळक टर्मिनस येथे शालिमार एक्स्प्रेसमध्ये काल (बुधवार) दुपारी जिलेटीनच्या ५ कांड्या आणि बॉम्बसदृश वस्तू आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या घटनेमागे शहरात काही घातपात घडविण्याचा कट आहे का? याचा पोलीस शोध घेत होते. मात्र, तसे काहीही नसून पूर्ववैमनस्यातून एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीस अटक करण्याच्या उद्देशाने हा कट आखला होता. पोलीस तपासात हा प्रकार निष्पन्न झाला आहे. पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी याबाबत माहिती दिली. या प्रकरणी पोलीसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्याची त्यांनी माहिती दिली. वाचा सविस्तर -
माझ्या मंत्रीपदाच्या निर्णयाचा अधिकार मुख्यमंत्र्यांना - विखे पाटील
अहमदनगर - माझ्या मंत्रीपदाच्या निर्णयाचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांना असल्याचे वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीत घुसमट झाली असली तरी जिल्ह्यातील दोन्ही लोकसभेच्या जागा जिंकल्याचे समाधान आहे. आता विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील बाराही जागांवर युतीचेच उमेदवार निवडून आणणार असल्याचा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला. वाचा सविस्तर -
वारीत प्रमुख ठिकाणी वारकऱ्यांना थेट स्क्रिनद्वारे विठ्ठल रुख्मिणीचे दर्शन - डॉ. अतुल भोसले
सोलापूर - विठ्ठल मंदिर समितीची गुरूवारी आषाढी पूर्व बैठक संपन्न झाली. आषाढी एकादशीच्या काळात पंढरपुरातील प्रमुख वाचा सविस्तर -ठिकाणी वारकऱ्यांना विठ्ठल रुख्मिणीचे स्क्रिनद्वारे थेट दर्शन देण्यात येणार असल्याची माहिती मंदीर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दिली.
'छपाक'चे शूटिंग पूर्ण, मेघना गुलजार यांनी सांगितला दीपिकाचा 'मालती' बनण्याचा प्रवास
मुंबई - 'राजी' चित्रपटाद्वारे आपल्या दमदार दिग्दर्शनाची प्रेक्षकांवर छाप पाडणाऱ्या मेघना गुलजार यांचा 'छपाक' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटात दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत झळकणार आहे. अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्या आणि इतरांसाठी प्रेरणा बनलेल्या लक्ष्मी अग्रवाल यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात दीपिकाने लक्ष्मी यांची भूमिका साकारण्यासाठी 'मालती' नावाचे पात्र साकारले आहे. अलिकडेच या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. या चित्रपटात दीपिकाने आव्हानात्मक भूमिका साकारली आहे. त्यामुळे दीपिका ते 'मालती' असा तिचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. असे मेघना गुलजार यांनी सांगितले आहे. वाचा सविस्तर -