मुंबई - चेंबूर सिद्धार्थ कॉलनी येथील झोपड्यांना मंगळवारी रात्री अचानक आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात मुंबई अग्निशमन दलाला यश आले असून, आगीत सात झोपड्या जळाल्या आहेत. आगीत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली आहे.
चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीतील आगीवर नियंत्रण, ७ झोपड्या जळून खाक - mumbai
चेंबूर सिद्धार्थ कॉलनी परिसरात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे. येथील आदित्य बिर्ला लेडीज हॉस्टेल जवळील जिल्हाधिकाऱ्यांच्या भूखंडावर झोपडपट्टी आहे. या झोपड्यांना रात्री ८ वाजून ५१ मिनिटांनी आग लागली.
चेंबूर सिद्धार्थ कॉलनी परिसरात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे. येथील आदित्य बिर्ला लेडीज हॉस्टेल जवळील जिल्हाधिकाऱ्यांच्या भूखंडावर झोपडपट्टी आहे. या झोपड्यांना रात्री ८ वाजून ५१ मिनिटांनी आग लागली. आग आजुबाजूच्या परिसरात पसरेल या भीतीने लोकांची पळापळ सुरू झाली. आग लागल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला दिली. मुंबई अग्निशमन दलाची चार वाहने घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाने रात्री उशिरा आगीवर नियंत्रण मिळवले. तोपर्यंत येथील सात झोपड्या आगीमध्ये जळून खाक झाल्या होत्या. या आगीमध्ये वित्तहानी झाली असली तरी कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.