महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Indian Citizenship : भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी युगांडा येथील 66 वर्षीय आजीबाईची उच्च न्यायालयात धाव

भारतीय नागरिकत्व (Indian citizenship) मिळावे या मागणीसाठी युगांडा येथील जन्म घेतलेल्या 66 वर्षीय आजीबाईने (66 year old grandmother) मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल केली ( runs to high court to get Indian citizenship) आहे. या याचिकेवर आज सुनावणी घेण्यात आली त्यावेळी केंद्र सरकारला 22 ऑगस्ट पर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

high court
उच्च न्यायालय

By

Published : Jul 8, 2022, 10:01 PM IST

मुंबई:आजीबाईंचा 1977 साली जतीन पोपट यांच्याशी विवाह झाला. 2019 पर्यंत त्या भारताच्या नागरिक होत्या. त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरत असताना चुकीच उल्लेख झाल्यामुळे त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला आणि त्यांचे नागरिकत्व नाकारण्यात आले. त्याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्या याचिकेवर न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. याचिकाकर्त्यांचे भारतीय नागरिकांशी लग्न झाले आहे. त्यामुळे त्या नागरिकत्व कायदा कलम 5 अंतर्गत भारतीय नागरिकत्वासाठी पात्र आहेत असा दावा इला यांच्यावतीने करण्यात आला.

परराष्ट्र मंत्रालयाचा इला यांना नागरिकत्व देण्यास कोणताही विरोध नाही. याचिकाकर्त्यांनी इथल्या नागरिकत्वासाठी परदेशी पासपोर्ट सादर करणे आवश्यक आहे. त्यांच्या आई वडिलांकडे ब्रिटीश पासपोर्ट असल्याने त्या ब्रिटीश पासपोर्ट बनवू शकल्या असत्या पण त्यांनी तो पण मिळवला नाही. याचिकाकर्त्यांनी युगांडामधील दूतावासाशी संपर्क साधून त्यांच्याकडून आवश्यक ती कागदपत्रे मिळवून सादर करावीत असे परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने वकील अद्वैत सेठना यांनी खंडपीठाला सांगितले. त्याची दखल घेत खंडपीठाने केंद्राला उत्तर देण्याचे आदेश देत पुढील सुनावणी 22 ऑगस्ट रोजी निश्चित केली.

हेही वाचा : Mumbai Corona Update : मुंबईत सलग आठव्या दिवशी रुग्णसंख्या 1 हजारांच्या खाली; 2 जणांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details