मुंबई-जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचे राज्यात रविवारी एकूण 10 नवीन रुग्ण आढळले असून यामुळे राज्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या 74 झाली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले.
covid19: राज्याचे कोरोनाचा दुसरा बळी; मुंबईतील 63 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू - रोजेश टोपे बातमी
कोरोना विषाणूचा महाराष्ट्रात विळखा वाढत आहे. राज्यात कोरोनाने दुसरा बळी घेतला आहे. मुंबईत एकाचा मृत्यू झाला आहे. करोनामुळे मृत्यू झालेली मुंबईतील ही दुसरी व्यक्ती आहे. 63 वर्षीय व्यक्तीवर एच.एन. रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू होते.
हेही वाचा-कोरोना अपडेट : राज्यात पहाटे पाच वाजेपर्यंत जनता कर्फ्यू वाढवला - आरोग्यमंत्री
कोरोना विषाणूचा महाराष्ट्रात विळखा वाढत आहे. राज्यात कोरोनाने दुसरा बळी घेतला आहे. मुंबईत एकाचा मृत्यू झाला आहे. करोनामुळे मृत्यू झालेली मुंबईतील ही दुसरी व्यक्ती आहे. 63 वर्षीय व्यक्तीवर एच.एन. रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू होते. 21 मार्च रोजी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मात्र, नागरिकांनी सहकार्य करावे करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असेही टोपे यांनी सांगितले.