महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 20, 2021, 10:08 PM IST

ETV Bharat / state

ST Workers Strike : आज 62 एसटी कर्मचारी निलंबित तर एकाला बडतर्फ

एसटी महामंडळाचे ( MSRTC ) राज्य शासनात विलिनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या 56 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन ( ST Workers Strike ) सुरू आहे. आज एकीकडे एसटी संपावर उच्च न्यायालयात सुनावणीत पार पडत होती तर दुसरीकडे एसटी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर महामंडळाकडून कारवाई सुरू होती. आज (दि. 12 ) महामंडळाने 62 एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या ही 10 हजार 818 वर जाऊन पोहोचली आहेत. तर आज निलंबित कर्मचाऱ्यांपैकी एका बडतर्फ केले आहे.

एसटी
एसटी

मुंबई- एसटी महामंडळाचे ( MSRTC ) राज्य शासनात विलिनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या 56 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन ( ST Workers Strike ) सुरू आहे. आज एकीकडे एसटी संपावर उच्च न्यायालयात सुनावणीत पार पडत होती तर दुसरीकडे एसटी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर महामंडळाकडून कारवाई सुरू होती. आज (दि. 12 ) महामंडळाने 62 एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित ( ST Workers Suspended ) केले आहे. निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या ही 10 हजार 818 वर जाऊन पोहोचली आहेत. तर आज निलंबित कर्मचाऱ्यांपैकी एका बडतर्फ केले आहे.

2 हजार 859 कर्मचाऱ्यांचा बदल्या -

एसटी महामंडळ विलीनीकरणाच्या मागणीवरुन सुरू असलेला संप आता चांगलाच चिघळला आहे. तब्बल 56 दिवस होऊनही एसटीचा संप सुरूच आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. एसटी कर्मचारी बेकायदेशीर संपावर गेल्यामुळे एसटी महामंडळाने जोरदार कारवाई सुरू केली आहे. महामंडळाने कर्तव्यावर रुजू न हाेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरू केली. महामंडळाने आतपर्यंत राेजंदारीवरील 2 हजार 58 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली असून 10 हजार 818 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. या शिवाय 2 हजार 859 कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहे. एसटी महामंडळाचा 72 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई केल्याची माहिती एसटी अधिकाऱ्यांनी दिली आहे.

आज केलेली कारवाई -

आज 62 एसटी कर्मचारी निलंबित झाले असून आतापर्यंत निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या 10 हजार 818

आज दोन रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली असून आतापर्यंत सेवा समाप्त कर्मचाऱ्यांची संख्या 2 हजार 58

आज 78 एसटी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली असून आतापर्यंत नोटीस बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या 638

आज निलंबित कर्मचाऱ्यांपैकी एकाचे बडतर्फ करण्यात आले असून आतापर्यंत बडतर्फ झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या 58

हे ही वाचा -आज ११ निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ, १११ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड

ABOUT THE AUTHOR

...view details