मुंबई- पवईतील आयआयटी मार्केटजवळच्या फुलेनगर परिसरात आज नवीन 6 कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली. या रुग्णांना आरोग्य विभागाच्या रुग्णवाहिकेत घेऊन जातेवेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. सध्या या परिसरात वाढणाऱ्या रुग्णांच्या आकड्याने रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
पवईत आढळले 6 कोरोनाग्रस्त, रुग्णांना नेताना पाहणाऱ्यांनी केली गर्दी - रुग्णांना नेताना पाहणाऱ्यांनी केली गर्दी
आयआयटी मार्केटजवळच्या फुलेनगर परिसरात आज नवीन 6 कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली. या रुग्णांना आरोग्य विभागाच्या रुग्णवाहिकेत घेऊन जातेवेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.
मुंबई महानगरपालिकेच्या एस विभागातील पवईत कोरोनाबाधित रुग्णाचा आकडा वाढतच आहे. संपूर्ण पवई विभागात 52 रुग्णांची नोंद झाली आहे तर आज फुलेनगरमध्ये 6 रुग्णाची भर पडली असून, फुलेनगरचा आकडा हा 13 झाला आहे. फुलेनगरमध्ये वाढती रुग्णसंख्या पाहता काल पालिकेने या भागात फेव्हर क्लिनिक शिबीर आयोजित केले होते. यावेळी परिसरातील लोकांनी मोठ्या प्रमाणात तपासणी करून घेतली. परिसरातील लोकांमध्ये रुग्ण आढळत असल्याने भीतीचे वातावरण होते. त्यातच आज एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये अजून भीती वाढली आहे.