मुंबई -आपल्या वडिलांना समाजातील लोकांनी करणी केल्याने मृत्यू झाला आहे, असा समज करून दोन भावानी समाजातील चार जणांच्या हत्येचा कट रचला होता.यातून एका वृद्धाची हत्यादेखील झाली. मात्र, तीन जणांची हत्या करण्याआधीच मुलुंड पोलिसांनी त्या दोन भावांसह चार जणांच्या हत्येची सुपारी घेणार्यांना असे एकूण सहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
अंधश्रध्देपोटी निष्पाप वृध्दाची हत्या, तीन जणांचे प्राण वाचले, ६ जणांना अटक - mulund murder news
मुलुंडमध्ये काही दिवसांपूर्वी मारुती लक्ष्मण गवळी या 70 वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या करण्यात आली होती.
मुलुंडमध्ये काही दिवसांपूर्वी मारुती लक्ष्मण गवळी या 70 वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येत मुलुंड पोलीसाना कोणताही पुरावा सापडत नव्हता. मात्र मारुती हे जोगवा मागत असत. त्यामुळे या अनुषंगाने देखील पोलिसांनी तपास केला. यावेळी त्यांच्या समाजातील काही लोकांनी पोलिसांना यात अंधश्रद्धेचा अँगल असल्याचे सांगितले. गेल्या महिन्यात कन्हैय्या मोरे या त्यांच्याच समाजातील व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला होता, आणि त्याच्या मुलांना यात समाजातील काही लोकांनी करणी केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची संशय होता.त्यांच्या अंतविधीसाठी समाजातील जे चार लोक अंत्यविधीसाठी आले नव्हते त्यांचे हे काम असावे म्हणून त्यांची हत्या करण्याची सुपारी त्यांच्या मुलांनी द्यायचं ठरवलं.
हे दोघे भाऊ अभिलेखावरील गुन्हेगार असल्यामुळे त्यांनी या चार जणांच्या हत्येची सुपारी देण्यासाठी घाटकोपर मानखुर्द गोवंडी याठिकाणी अभिलेखा वरील गुन्हेगारांची निवड केली. मोहम्मद आसिफ नासिर शेख, मोहम्मद मैनुद्दीन अन्सारी, मोहम्मद आरिफ अब्दुल सत्तार खान आणि शहानवाज ऊर्फ सोनू अखतर शेख यांना ७० हजार रुपयांची सुपारी दिली असल्याची माहिती परिमंडळ ७ चे उपायुक्त प्रशांत कदम यांनी सांगितले .
२ ऑक्टोबर ला या टोळीने यातील मारुती गवळी यांची हत्या केली.तर यातील दुसरा इसम गावाला गेल्याने त्याचा हत्येचा प्लॅन आणि इतर आणखी दोघांचा प्लॅन ही आखत होते.मात्र मुलुंड पोलिसांनी वेळेतच या सर्व हत्येचा छडा लावल्याने आणखी तीन हत्या रोखल्या गेल्या. मात्र अजून ही 21 व्या शतकात अंधश्रद्धेची पाळेमुळे किती खोलवर रुतली गेली आहेत हे या घटनेवरून स्पष्ट होते.