मुंबई - मंगळवारी (दि. 8 डिसें.) 585 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले असून 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 4 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते.
एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 87 हजार 175 वर
मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 87 हजार 175 वर पोहोचला आहे. तर, एकूण मृतांचा आकडा 10 हजार 920 वर पोहोचला आहे. मुंबईमधून मंगळवारी 565 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. मुंबईत कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा 2 लाख 63 हजार 354 वर गेला आहे. सध्या मुंबईत 12 हजार 077 सक्रिय रुग्ण आहेत.
रुग्ण दुप्पटीचा कालावधी 284 दिवसांवर
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92 टक्क्यांवर पोहोचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 284, दिवस तर सरासरी दर 0.25 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 453 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन (प्रतिबंधीत क्षेत्र) घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 5 हजार 373 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 20 लाख 13 हजार 277 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.
अशी वाढली रुग्णसंख्या