मुंबई - धारावीतील कोरोनाबाधितांचा आकडा 1 हजार 353 वर पोहोचला आहे, तर रोज 25 ते 50 च्या दरम्यान वा कधी त्यापेक्षा अधिक रुग्ण येथे आढळत आहेत. त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. मात्र, त्याचवेळी दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्या धारावीकरांचा आकडा देखील लक्षणीय आहे. बुधवारपर्यंत (20 मे) 525 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. येथील रुग्णसंख्या कमी करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत.
धारावी कोरोना हॉटस्पॉट : आतापर्यंत 525 धारावीकर कोरोनामुक्त - मुंबई कोरोना अपडेट न्यूज
धारावीत पहिला रुग्ण सापडल्याबरोबर प्रशासनाची चिंता वाढली. दाटीवाटीच्या वस्तीत साडेसात लाख लोक राहत असल्याने येथे फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे शक्य नाही. त्यामुळे येथे कोरोनाचा कहर वाढण्याची ही शक्यता होती. शेवटी तसेच झाले. एका मागोमाग एक मोठया संख्येने येथे रुग्ण आढळू लागले.
धारावीत पहिला रुग्ण सापडल्याबरोबर प्रशासनाची चिंता वाढली. दाटीवाटीच्या वस्तीत साडेसात लाख लोक राहत असल्याने येथे फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे शक्य नाही. त्यामुळे येथे कोरोनाचा कहर वाढण्याची ही शक्यता होती. शेवटी तसेच झाले. एका मागोमाग एक मोठया संख्येने येथे रुग्ण आढळू लागले. त्यानंतर मात्र पालिकेने हा परिसर सील करत नागरिकांचे स्क्रिनिंग आणि टेस्ट करण्यास सुरुवात केली. हळूहळू क्वारंटाइनची संख्या ही वाढवली. मात्र, अद्यापही तितकी रुग्णसंख्या घटलेली नाही. त्यात मोठी वाढ देखील होत नसल्याचे म्हटले जात आहे.
बुधवारी येथे 25 रुग्ण आढळल्याने येथील एकूण रुग्णसंख्या 1353 वर पोहोचली आहे, तर येथे 56 रुग्ण दगावले आहेत. रुग्णांची आणि मृत्यू झालेल्यांची संख्या जास्त असली, तरी रुग्ण बरे होत आहेत हे महत्वाचे आहे. धारावीत 20 मेपर्यंत ५२५ रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचा दर ३९ टक्के असून ही दिलासादायक बाब असल्याचे जी उत्तरचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर म्हणाले.