महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संपत्तीच्या वादातून मुंबईत भरदुपारी गोळ्या झाडून हत्या - पोलीस

साकिनाका येथील नाहर सिटी परिसरात एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना आज दुपारी घडली. इब्लिस शेख असे मृत व्यक्तीचे नाव आहे. संपत्तीच्या वादातून ही हत्या झाल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती आहे.

संपत्तीच्या वादातून मुंबईत भरदुपारी गोळ्या झाडून हत्या

By

Published : May 26, 2019, 1:33 PM IST

मुंबई - साकिनाका येथील नाहर सिटी परिसरात एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना आज दुपारी घडली. इब्लिस शेख (५५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. संपत्तीच्या वादातून ही हत्या झाल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती आहे.

मृत इब्लिस शेख हे साकिनाका येथील रहिवासी आहेत. आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास नाहर सिटी येथील गेट जवळ एका ५० वर्षीय व्यक्तीने त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. ही माहिती मिळताच साकिनाका पोलीस घटनास्थळी पोहोचून जखमीला राजावाडी रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी जखमीला मृत घोषित केले.

दरम्यान, हत्या करणारा आरोपी हा मृताचा नातेवाईक असून संपत्तीच्या वादातून हत्या झाल्याचे पोलिसांची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी पोलीस अधिक माहिती घेत असून संपूर्ण चौकशी झाल्यानंतर पुढील माहिती देऊ, असे साकिनाका पोलिसांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details