मुंबई - आज (दि. 17 नोव्हेंबर) मुंबईत नव्या 541 रुग्णांची नोंद झाली असून 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या महिनाभरात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 69 वरून 297 दिवस इतका वाढल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
मुंबईतील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख पार
मुंबईत आज (मंगळवारी) कोरोनाचे 541 नवे रुग्ण आढळून आले असून 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 11 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 9 पुरुष तर 5 महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 70 हजार 654 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 10 हजार 596 वर पोहोचला आहे.
8 हजार 946 सक्रिय रुग्ण
मुंबईमधून आज 1 हजार 565 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 47 हजार 339 वर गेला आहे. सध्या मुंबईत 8 हजार 946 सक्रिय रुग्ण आहेत.
रुग्ण दुप्पटीचा कालावधी 297 दिवसांवर
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 297 दिवस तर सरासरी दर 0.23 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 449 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 5 हजार 227 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 16 लाख 95 हजार 744 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.
या आधी कमी नोंद झालेली रुग्णसंख्या