रेमडेसिवीरचा काळाबाजार, राज्यात ५४ गुन्ह्यांची नोंद - रेमडेसिवीरचा काळाबाजार
महाराष्ट्र पोलिसांच्या विशेष पथकाने रेमडेसिवीरच्या काळाबाज प्रकरणी राज्यभरात ५४ गुन्ह्यांची नोंद केली आहे.
Ramdesivir's black market
मुंबई - महाराष्ट्रात रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे. हे पथक स्वतंत्रपणे त्यांची कारवाई करत आहे. सोशल मीडियावरही अशा फसवणूक करणाऱ्यांवर सायबर पोलिसांना लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.
या पथकाने महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात मागच्या दोन महिन्यात ५४ गुन्हे नोंदवलेले आहेत. या कारवाईत आतापर्यंत पुण्यात १० आणि नागपुरात सर्वाधिक ११ गुन्ह्यांची नोंद केली असल्याचे सुत्रांनी सांगितले.