महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आणखी दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू, राज्यातील मृत पोलिसांचा आकडा 51 वर

मागील चोवीस तासांत राज्यातील दोन कोरोनाग्रस्त पोलिसांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजवर मृत्यू झालेल्या पोलिसांचा आकडा 51वर पोहोचला आहे.

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र

By

Published : Jun 24, 2020, 12:19 PM IST

मुंबई - कोरोना संक्रमण थांबविण्यासाठी रस्त्यावर पोलीस त्यांचे कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस दलासाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्य पोलीस दलात गेल्या 24 तासांत आणखीन 2 कोरोनाग्रस्त पोलिसांचा मृत्यू झाला असून यामुळे राज्यातील कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या पोलिसांचा आकडा 51 वर गेला आहे.

राज्यातील विविध रुग्णालयांत कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्येत घट झाली असून सध्याच्या घडीला 998 पोलिसांवर उपचार सुरू आहेत. यात 104 पोलीस अधिकारी तर, 894 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दुर्दैवाने आतापर्यंत राज्यात 2 पोलीस अधिकारी व 49 पोलीस कर्मचारी अशा 51 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासांत 36 पोलीस कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यभरात टाळेबंदी सुरू झाल्यापासून कलम 188नुसार तब्बल 1 लाख 34 हजार 601 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. मुंबई वगळता क्वारंटाइनचा नियम मोडणाऱ्या 740 जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. राज्यभरात टाळेबंदीच्या काळात पोलिसांवर हल्ला होण्याच्या 279 घटना घडल्या असून याप्रकरणी आतापर्यंत 858 जणांना अटक करण्यात आली आहे. कोरोनाच्या संदर्भात तब्बल 1 लाख 4 हजार 424 कॉल पोलीस नियंत्रण कक्षावर आले आहेत.

टाळेबंदीच्या काळात अवैध वाहतुकीच्या 1 हजार 335 प्रकरणात 27 हजार 481 जणांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत 84 हजार 161 वाहन जप्त करण्यात आली असून तब्बल 8 कोटी 72 लाख 42 हजारांचा दंड पोलिसांनी ठोठावला आहे. राज्यात वैद्यकीय पथकावर हल्ला होण्याच्या 52 घटना घडल्या असून 86 पोलीस हे जखमी झाले आहेत.

सर्वाधिक मृत्यू मुंबई पोलीस खात्यात

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्दैवाने मुंबईतील 34 पोलीस व 2 अधिकारी अशा एकूण 36 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर पुण्यात 3, सोलापूर शहर 2, नाशिक ग्रामीण 3 , दहशतवादी विरोधी पथक 1, मुंबई रेल्वे पोलीस दल 2, ठाणे ग्रामीण 2, जळगाव ग्रामीण 1 व पालघर पोलीस खात्यातील एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा -मुंबईत मंगळवारी 846 नवीन कोरोनाबाधितांची नोंद, तर 107 जणांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details