महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

5 हजार खाटांचे संसर्गजन्य रोगांचे रुग्णालय भांडुप की मुलुंडमध्ये? लवकरच होणार निर्णय - मुंबई संसर्गजन्य रोगांचे रुग्णालय

मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून 5 हजार बेडच्या पहिल्या सर्वात मोठ्या कायमस्वरूपी रुग्णालयाची उभारणी केली जाणार आहे. हे रुग्णालय पूर्व उपनगरात असणार असून आता फक्त हे मुलुंडमध्ये असेल की भांडुपमध्ये असणार यावर निर्णय होणे बाकी आहे.

Hospital
रुग्णालय

By

Published : Aug 26, 2020, 12:35 PM IST

मुंबई -कोरोनासारख्या महामारीशी सामना करण्यासाठी मुंबईत कायमस्वरूपी आणि मोठे संसर्गजन्य रोगांचे रुग्णालय बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून 5 हजार बेडच्या पहिल्या सर्वात मोठया कायमस्वरूपी रुग्णालयाची उभारणी केली जाणार आहे. हे रुग्णालय पूर्व उपनगरात असणार असून आता फक्त हे मुलुंडमध्ये असेल की भांडुपमध्ये असणार यावर निर्णय होणे बाकी आहे. या रुग्णालयासाठी महापालिकेला 20 एकर जागा देण्यासाठी दोन जणांनी तयारी दाखवली असून एकाची जागा मुलुंडमध्ये आहे तर दुसऱ्याची जागा भांडुपमध्ये आहे.

पूर्व किंवा पश्चिम उपनगरात हे रुग्णालय उभारण्याच्या दृष्टीने पालिकेने काही दिवसांपूर्वी 20 एकर जागा असलेल्यांकडून जमीन संपादीत करण्यासाठी प्रस्ताव मागवले होते. मात्र, एकच प्रस्ताव आल्याने महापालिकेने मुदतवाढ देत पुन्हा प्रस्ताव मागवले. त्यानुसार आता दोन जणांनी जागा देण्यासाठी प्रस्ताव दिले असून मंगळवारी त्यांची नावे समोर आली आहेत. श्वास कन्स्ट्रक्शन आणि राजाराम ओव्हाळ अँड फॅमीली या दोन ठिकाणांहून जागेसाठी प्रस्ताव आल्याची माहिती पालिकेचे उपजिल्हाधिकारी (लँड) भैय्यासाहेब बेहेरे यांनी दिली. यातील राजाराम ओव्हाळ यांची जागा भांडुपमध्ये असून श्वास कन्स्ट्रक्शनची जागा मुलुंडमध्ये आहे.

महानगरपालिका आता या दोन्ही प्रस्तावांची छाननी आणि मूल्यांकन करेल. त्यानंतर जागेची पाहणी करत कोणती जागा निवडायची याचा निर्णय घेईल. त्यामुळे मुंबईतील पहिले मोठे संसर्गजन्य रुग्णालय मुलुंडमध्ये होणार की, भांडुपमध्ये हे लवकरच समजेल.

ABOUT THE AUTHOR

...view details