मुंबई -आज राज्यात ५ हजार ५४४ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १८ लाख २० हजार ५९ वर पोहोचला आहे. राज्यात आज ८५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४७ हजार ७१ रुग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर २.५९ टक्के एवढा आहे. राज्यात एकूण ९० हजार ९९७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात आज ४ हजार ३६२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण १६ लाख ८० हजार ९२६ कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.३६ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ८ लाख ४ हजार ४२२ नमुन्यांपैकी १८ लाख २० हजार ५९ नमुने म्हणजेच, १६.८५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख २६ हजार ५५५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये, तर ६ हजार ८१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.