महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईतील गोवंडीत घर कोसळल्याने 5 जण जखमी - मुंबई

मुंबईतल्या गोवंडी विभागातील शिवाजी नगरात घर कोसळून 5 जण जखमी झाल्याची घटना घडली. यात जखमींना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही

गोवंडीत घर कोसळल्याने 5 जन जखमी

By

Published : Jul 8, 2019, 12:56 PM IST

मुंबई - काल रात्री मुंबईतल्या गोवंडी विभागातील शिवाजीनगरात घर कोसळून 5 जण जखमी झाल्याची घटना घडली. यात जखमींना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.

गोवंडीत घर कोसळल्याने 5 जन जखमी
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. शिवाजी नगरात हे घर तळ मजला अधिक 1असे होते. दोन्ही घरात मिळून एकूण 22 जण होते. रात्री 2 वाजण्याच्या सुमारास अचानक वरचा मजला कोसळला. आणि त्याच्या ओझ्यामुळे खालचा मजला ही कोसळला. खालच्या घरात काही जण अडकले होते. याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्यानंतर त्यांनी अग्निशामक दलाला सदरील घटनेची माहिती दिली. अग्निशामक दल घटनास्थळी आल्यावर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढून उपचारासाठी राजवाडी रुग्णालयात पाठवण्यात आले. हे घर पावसामुळे पडले की, कशाने? याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details