महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Balcony Collapse In Mumbai : मुंबईतील वर्सोवात इमारतीची बाल्कनी कोसळली, पाच नागरिक दबले ढिगाऱ्याखाली - इमारत

मुंबईतील वर्सोवा परिसरातील एका सात मजली इमारतीची बाल्कनी कोसळून 5 जण गंभीर जखमी झाले. या जखमी नागरिकांना महापालिकेच्या कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Balcony Collapse In Mumbai
कोसळलेला ढिगारा

By

Published : May 6, 2023, 8:36 AM IST

मुंबई :इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनीच्या भिंतीचा काही भाग कोसळल्याने ५ जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. ही घटना अंधेरी येथील वर्सोवा यारी रोडवरील सात मजील इमारतीमध्ये घडली आहे. सर्व जखमींना महापालिकेच्या कूपर हॉस्पिटलसह अंजुमन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कूपर हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

बांधकामामुळे कोसळली भिंत :यारी रोडवर सिल्व्हर स्ट्रीक अपार्टमेंट नावाची सात मजली इमारत आहे. या इमारतीजवळ बांधकाम सुरू आहे. इमारतीच्या बांधकामाने मोठमोठे आघात होऊन कंपने निर्माण होत आहेत. त्यामुळे बांधकामातून झालेल्या कंपनामुळे इमारतीची बाल्कनी खाली पडली. या अपघातात ५ नागरिक ढिगाऱ्याखाली दबून गंभीर जखमी झाले.

नागरिकांनी दबलेल्या जखमींना काढले बाहेर :इमारतीची बाल्कनी पडल्याची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. अग्निशमन दल पोहोचण्यापूर्वी इमारतीच्या पडक्या बाल्कनीच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या नाकांना स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार जखमींपैकी नंदिनी सरवदे ( वय 16 वर्ष ), दिवांजली आरोळे ( वय 16 वर्ष ), आणि सोफिया खान यांना महापालिकेच्या कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर सौकत अन्सारी ( वय 23 वर्ष ), आणि अमन शाहू ( वय 16 वर्ष ) यांना सोफिया रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

जखमी नागरिकांची प्रकृती स्थिर :सात मजली इमारतीची बाल्कनी कोसळल्याने नागरिक जखमी झाले. त्यामुळे या परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला. नागरिकांनी गर्दी केल्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र मदतीसाठी आलेल्या नागरिकांनी अग्निशमन दलाचे जवान येण्यापूर्वीच जखमी नागरिकांना ढिगाऱ्याबाहेर काढले. त्यानंतर या जखमी नागरिकांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कूपर आणि अंजुमन रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. बाल्कनीचा लटकलेला भाग जेसीबीच्या मदतीने काढण्याचे काम सुरू आहे. जमिनीवर पडलेला ढिगारा हटविण्याचे कामही महापालिकेच्या पश्चिम विभागाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा - What Is Honeytrap : हनीट्रॅपमध्ये कसे अडकवले जाते? कशी होते फसवणूक? पाहा व्हिडिओ...

ABOUT THE AUTHOR

...view details