महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

5 जणांच्या आंतरराज्य चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीला अटक

मुंबईत 5 जणांच्या आंतरराज्य चेन स्नाचिंग करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आलेली आहे.

By

Published : Jun 10, 2021, 5:35 PM IST

5 जणांच्या आंतरराज्य चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीला अटक
5 जणांच्या आंतरराज्य चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीला अटक

मुंबई- मुंबई पोलिसांच्या परिमंडळ 7 च्या पथकाकडून करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान 5 जणांच्या आंतरराज्य चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आलेली आहे.

बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, भोपाळ सारख्या शहरात चेन स्नॅचिंग
22 मे रोजी मुंबईतील विद्या विहार परिसरातील निळकंठ किंग्डम कॉम्प्लेक्स जवळ एका महिलेला बोलण्यात गुंतवून तिच्या हातातील 50 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या पिशवी ठेवण्याच्या बहाण्याने या आरोपींनी चोरून नेल्या होत्या. यासंदर्भात पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर यात तपास केला जात होता. याप्रकरणी पोलिसांनी मजलुम फैयाज हुसेन उर्फ जग्गू, काशीफ हैदर सय्यद इराणी, तलीब ईरानी, जाफर अली ईरानी, सदिक अली रहमत सैफुल्ला जाफरी, या 5 आरोपींना कल्याण मधील आंबिवली परिसरातून अटक केलेली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी हे बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, भोपाळ सारख्या शहरात चेन स्नॅचिंग गुन्ह्यात तेथील स्थानिक पोलिसांना हवे होते.

पांढऱ्या रंगाची कापडे घालून पोलीस असल्याची बतावणी
या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी कासिम हैदर हा पांढऱ्या रंगाची कपडे घालून रस्त्यावरून जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना तो पोलीस असल्याचे सांगत होता. पुढे गुन्हा घडला असून तुम्ही तुमच्या अंगावरचे दागिने काढून पिशवीत ठेवण्याच्या बहाण्याने तो ज्येष्ठ नागरिकांचे दागिने चोरून जागेवरून पळून जात होता. या आरोपीकडून पोलिसांनी 1 मोटारसायकल व 25 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या हस्तगत केलेले आहेत. या 5 जणांच्या टोळीपैकी कासिम याच्यावर 37 गुन्हे दाखल असून, मजलुम याच्यावर 31 गुन्हे दाखल असल्याचं समोर आलं आहे. यातील इतर दोन आरोपी जाफराली व सादिक अली यांच्या वरही चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details