मुंबई : कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी रिक्त पदांसाठी तसेच जुन्या पेन्शनसाठी अशा विविध स्वरूपाच्या मागण्यांसाठी मागच्या आठवड्यात आंदोलन केले होते. शिक्षण मंत्र्यांनी त्यातल्या काही मागण्या सकारात्मकरित्या मान्य केल्याचेही निष्पन्न झाले. त्यानंतर तो संप मागे घेतला गेला. बारावीच्या परीक्षेसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कामावर रुजू झाले. मात्र आता उद्यापासून 100% संपात ते देखील सहभागी होणार असल्यामुळे बारावीच्या परीक्षांचे काय आणि दहावीच्या पण परीक्षांचे काय होणार ? हे मोठे संकट राज्यातील जनतेवर आणि शासनावर आहे. कारण जुनी पेन्शन योजना हा महत्त्वाचा आणि धोरणात्मक निर्णय असल्यामुळे त्याबाबत शासनाने निर्णय काही केलेला नाही.
शालेय शिक्षकदेखील सहभागी होणार : जुनी पेन्शन योजना ही 2005 पासून महाराष्ट्र शासनाने बंद केली. त्याआधीच्या सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू आहे. मात्र 2005 नंतर जे लागू झालेले आहेत त्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळत नाही आणि निवृत्ती वेतन मिळत नाही. त्यामुळेच महागाईच्या जमान्यात जगायचे कसे असा प्रश्न सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे आहे. म्हणून आज राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सोबत पाच ते सात लाख राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संपामध्ये पूर्ण सहभागी होणार आहे. यामध्ये शालेय शिक्षकदेखील सहभागी होणार असल्यामुळे राज्यातील जिल्हा परिषद शाळा अनुदानित शाळा त्यांचे कामकाज चालणार की ठप्प होणार हे देखील उद्या समजणार आहे.