आज दिवसभरात -
- सिंधुताई सपकाळ यांच्यावर आज पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
पुणे - सिंधुताई सपकाळ यांचं पार्थिव आज सकाळी 8 वाजता मांजरी येथील बाल निकेतन सदन येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 12 वाजता ठोसर पागेत महानुभाव पंथानुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. सिंधुताई यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
- अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी
मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. अनिल देशमुख हे सध्या ईडी कोठडीत आहेत. त्यांनी जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज सुनावणी होत आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांना बेल की जेल यावर आज निर्णय येण्याची शक्यता आहे.
- एसटी संपावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी
मुंबई - राज्यात जवळपास दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. एसटी संपावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचारी संपावर आहेत.
- कॉलेज सुरू ठेवण्याबाबत आज होणार निर्णय
मुंबई - वाढत्या कोविडच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालय, विद्यापीठ सुरू ठेवणार की बंद याचा निर्णय आज होणार आहे. मंत्री उदय सामंत याबाबत बैठक घेऊन आज निर्णय जाहीर करणार आहेत. राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक भागातील शाळादेखील बंद करण्यात आल्या आहेत.
- मनसेचे मुंबईत ढोल बजाव आंदोलन
मुंबई - गुंठेवारी नियमित करत असताना लावण्यात येणारे शुल्क माफ करा या मागणीसाठी मनसेकडून मुंबईत आज ढोल बजाव आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलना मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असल्याचे मनसेकडून सांगण्यात आले आहे.
- शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज ओबीसी आरक्षणाची बैठक
मुंबई - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज ओबीसी आरक्षणाची बैठक होणार आहे. यावेळी ओबीसीचे राज्यातील अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. ओबीसी आरक्षणाचा तिढा अजूनही कायम आहे. यावरच चर्चा करण्यासाठी शरद पवार हे आज बैठक घेणार आहेत.
- कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक
कोल्हापूर - आज कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक होत आहे. बहुचर्चित अशी ही निवडणूक प्रक्रिया आज पार पडणार आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा बँकेवर कोणाचा झेंडा फडकणार हे लवकरच कळणार आहे.
आजचे राशीभविष्य वाचा -
काल दिवसभरात -
पुणे -अनाथांचा आधार, हजारो लेकरांची माय अशी ओळख असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal Passes Away) यांचं पुण्यात निधन झालं. त्या 74 वर्षांच्या होत्या. पुण्यातील गॅलक्सी रुग्णालयात (Galaxy Hospital) त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून उपचार सुरु होते. त्यांना 25 नोव्हेंबर रोजी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांचं लार्ज फायटर हायटस हर्नियाचं ऑपरेशन झालं होतं. या ऑपरेशननंतर त्यांना फुफ्फुसात संसर्ग झाल्याने त्यांची तब्येत खालावली होती. मंगळवारी (4 जानेवारी) अखेर हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांची प्राणज्योत मालवली.
पुणे -माई या निघून नाही गेल्या तर वादळ होतं ते शांत झाले. निघून गेल्या हा शब्द कोणीही वापरू नका. आईसारख्या व्यक्ती या कधीच निघून जात नाहीत तर त्या जिवंत असतात, अशी भावनिक प्रतिक्रिया सिंधुताई सपकाळ यांची मुलगी ममता सपकाळ (Mamta Sapkal) यांनी दिली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या (Social Worker), हजारो लेकरांची माय (Mother of Orphans) सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचं मंगळवारी (4 जानेवारी) निधन झाले. पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
पुणे - सामाजिक कार्यकर्त्यां आणि 'अनाथांची माय' अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal Death) यांचे पुण्यातील रुग्णालयात निधन झाले. सामाजिक कार्याबद्दल त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सिंधुताईंचा आयुष्याचा प्रवास खूपच थक्क करुन सोडणारा होता.
मुंबई - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या (Social Worker), हजारो लेकरांची माय (Mother of Orphans) सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचं मंगळवारी (4 जानेवारी) निधन झालं. पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राष्ट्रपती कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राजकीय, सामाजिक, कला आदी क्षेत्रातील दिग्गजांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुंबई- राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही भागात निर्बंध कठोर लावले आहेत. तरीही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज (दि. 4 जानेवारी) दिवसभरात राज्यात 12 हजार 160 नवीन बाधितांचे निदान ( Maharashtra Corona Cases ) झाले. तर 20 रुग्णांचा आज मृत्यू झाला. दुसरीकडे ( Maharashtra Omicron Cases ) ओमायक्रॉनचे 75 नव्या रुग्णांची भर पडली आहे. ओमायक्रॉनचा एकही मृत्यू झाला नसल्याचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. दिवसेंदिवस वाढत्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.