महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईतील ५ बोगस डॉक्टरांना अटक, बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रावर चालवत होते रुग्णालय

मुंबईतील झोपडपट्टी भागात बनावट वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारावर रुग्णालय चालवणाऱ्या ५ डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर यापूर्वीच गुन्हे दाखल करण्यात आले होते.

fraud doctors mumbai
मुंबईतील ५ बोगस डॉक्टरांना अटक,

By

Published : Jan 13, 2020, 4:28 PM IST

मुंबई -शहरातील वेगवेगळ्या परिसरातून 5 बोगस डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या गुन्हे शाखा क्रमांक ९, ११ आणि १२ ने ही कारवाई केली. हे पाचही आरोपी वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसताना बोगस वैद्यकीय प्रमाणपत्रावर पश्चिम उपनगरात रुग्णालय चालवत होते. अटक आरोपींपैकी 2 जणांवर २०१५ मध्ये जुहू पोलीस ठाण्यात, तर 2 जणांवर २०१८ मध्ये मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

मुंबईतील ५ बोगस डॉक्टरांना अटक

स्वप्न कुमार मंडळ, रामकुमार माताप्रसाद मिश्रा, शोहेब अगरिया, तुकाराम थोरात, पी. ए. अजित, असे पाचही आरोपींचे नावे आहेत. हे सर्वजण मुंबई उपनगरातील विलेपार्ले, जुहू, मालवणी, ओशिवार परिसरात रुग्णालय चालवत होते. तसेच कोणत्याही प्रकारचे गंभीर आजार पूर्णपणे बरे करण्यात येतील, अशी जाहिरात करत होते. पोलिसांनी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र, इंजेक्शन व औषधांचा साठा या आरोपींकडून जप्त केला आहे.

बोगस डॉक्टर रुग्णांना आकर्षित करण्यासाठी सार्वजनिक शौचालय, रेल्वे स्थानक व बस स्थानकावर जाहिरात चिटकवून दुर्धर व गंभीर आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातील, असा दावा करत होते. वैद्यकीय प्रमाणपत्र नसतानाही इंजेक्शन व इतर औषधांचा वापर करीत रुग्णांच्या जीवाशी खेळ करत होते. मात्र, काही दिवसांनी हा प्रकार समोर आला. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करीत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details