मुंबई - राज्यात केंद्राप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. येत्या २९ फेब्रुवारीपासून कर्मचाऱ्यांना हा नवीन नियम लागू होणार आहे. या निर्णयामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली शासकीय कर्मचाऱ्यांची मागणी पूर्ण होणार आहे.
कामाची वेळ ४५ मिनिटांनी वाढवून, अत्यावश्यक सेवा वगळून तसेच कामकाजाच्या दृष्टीने कुठलाही परिणाम होणार नाही अशा प्रकारचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे मांडण्यात आला होता. राज्यातील रिक्त पदे भरणे, मंत्रालयात महिलांसाठी विश्राम कक्ष याशिवाय विश्रामगृहांमध्ये महिला अधिकाऱ्यांसाठी आरक्षणासह चक्राकार पद्धतीने होणाऱ्या बदल्यांबाबत धोरण ठरवण्याबाबतच्या मागण्यादेखील शासनाने मंजूर केल्याचे सांगण्यात येत आहे.
या बैठकीतील इतर महत्त्वाचे निर्णय