नवी मुंबई : बेलापूरमध्ये गुजरातमधील रस्ते कंत्राटदाराला जुन्या नोटा बदलून नव्या करकरीत नोटा देतो, (Giving new notes by exchanging old notes) अशी बतावणी करत तब्बल 5 कोटींचा गंडा घालण्यात आला (defrauding contractor of 5 crores) आहे. विशेष म्हणजे या कंत्राटदाराला दिवाळीत आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्यासाठी नवीन नोटांची आवश्यकता होती. याचाच फायदा घेत ठगांनी बाबूजयेशसिंग ठाकूर यांना सहा कोटींना चुना लावला (Financial Fraud with Contractor Mumbai) आहे. विशाल विरोजा, मोईन कादरी, सुशांत कुलकर्णी अशी आरोपींची नावे असून इतरही काही अज्ञात व्यक्तींचा या गुन्ह्यात समावेश असल्याची माहिती बेलापूर पोलिसांनी दिली आहे. latest news from Mumbai, Mumbai Crime, showing lure of issuing new notes currency
आरोपी फरार-यापैकी एका आरोपीला पकडले असून मुख्य आरोपी मोईन कादरीसह अन्य आरोपी फरार आहेत. अजय मिश्रा नावाचा व्यक्ती आपल्याला नेहमी नव्या नोटा द्यायचा असे कंत्राटदार असलेल्या ठाकूर यांनी सांगितले. ऑगस्टमध्ये ठाकूर यांनी नव्या नोटांसाठी मिश्राशी संपर्क साधला. मिश्राने ठाकूर यांची ओळख विशाल आणि विरोजाशी करून दिली. विशालचा मित्र आरबीआयच्या कोषागारात काम करत असल्याची बतावणी मिश्राने केली. मलाही दीड कोटी रुपयांच्या करकरीत नोटा हव्या आहेत. त्यामुळे आपण नोटा घेण्यासाठी नवी मुंबईला सोबतच जाऊ असे विरोजाने ठाकूर यांना सांगितले. ठाकूर आणि विरोजा २६ सप्टेंबरला बेलापूरला पोहोचले. तिथे त्यांना मोईन काद्री आणि सुशील कुलकर्णी भेटले.