महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईतून बांग्लादेशात पाठवायचे पैसे, 5 बांगलादेशी नागरिकांना अटक

Bangladeshi Arrested : भारतात बेकायदेशीररीत्या घुसखोरी करून वास्तव्य करणाऱ्या दोन बांग्लादेशींना शिवडी रेल्वे स्थानकानजीक सापळा रचून अटक केली. हे अवैधरित्या मुंबईत राहत होते. आतापर्यंत ९ आरोपींना अटक केली असून काही बांगलादेशी शिवडी, वडाळा, ठाणे आणि नवी मुंबईत राहत असल्याची माहिती, पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन (Raj Tilak Roshan) यांनी दिलीय.

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 13, 2023, 10:12 PM IST

Bangladeshi Arrested
बांगलादेशी नागरिकांना अटक

माहिती देताना पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन

मुंबईBangladeshi Arrested : मागील काही वर्षांपासून मुंबईत वास्तव्यास असलेल्या नऊ बांगलादेशी आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींची मोडस ऑपरेंडी अशी आहे की, ते पहिले बेकायदेशीररित्या भारतात आले होते. तसेच त्यांनी बोगस आधार कार्ड बनवले. नंतर बँक खाते उघडून अवैधरित्या भारतातून बांग्लादेशात पैसे पाठवत होते. कोणी कामानिमित्त बांगलादेशातून भारतात आलं तर त्यांना पैसे पुरवत असत. तसेच बांग्लादेशात पैसे पाठवण्याचे काम देखील करत होते.

बऱ्याच वर्षांपासून मुंबईत : बोगस कागदपत्रांच्या आधारे त्यांनी आधार कार्ड बनवले आणि बँक खाती देखील उघडली. तपासामध्ये सुरुवातीला पारपत्र अधिनियम १९५० कलम ३ अ, ६ अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर बोगस कागदपत्रे बनवल्याचे निष्पन्न झाल्याने भारतीय दंड संविधान कलम ४६५, ४६८ आणि ४७१ ही वाढवण्यात आली असल्याची माहिती, पोलीस उपयुक्त राज तिलक रोशन (Raj Tilak Roshan) यांनी दिलीय. मुख्य दोन आरोपी गेल्या बऱ्याच वर्षांपासून मुंबईत राहत असल्याचं समोर आलं आहे. तर बोगस कागदपत्रे बनवून देणाऱ्यांचा देखील पोलिसांनी शोध सुरू केला आहे.



बांगलादेशी आरोपींना अटक: कमिशन घेऊन बेकायदेशीररीत्या बांगलादेशी नागरिकांना प्रवेश देऊन कामधंदा मिळवून देऊन त्यांचे पैसे बांग्लादेशात पाठवण्याचे काम करणारा, १ एजंट आणि त्याची एक महिला साथीदारला अटक करण्यात आली आहे. याबाबत आरएके मार्ग पोलीस ठाण्यात कलम ४६५, ४६८, ४७१, पारपत्र अधिनियम १९५० कलम ३३ अ, ६अ आणि परकीय नागरिक आदेश १९४८ कलम ३(१) सह विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ कलम १४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या अटक दोन आरोपींकडे केलेल्या चौकशीत ९ डिसेंबरला २ बांग्लादेशींना अटक करण्यात आली. त्यांची पोलीस कोठडी घेऊन सखोल चौकशी करून मिळालेल्या माहितीवरून आणखी ५ मूळ बांगलादेशी आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर पाच अटक आरोपींची नावे मसूद हारुण शेख (वय २६), बिलाल हारुण शेख (वय ३१), रफिक आबिद अली शेख उर्फ अब्दुल कादरी मंडल (वय ५१), रमन सिकंदर शेख (वय ३४), सुमन मोमीन शेख (वय ३२) अशी असून त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले आहे. न्यायालायने या पाच जणांना १६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा -

  1. Five Bangladeshi Arrested : बनावट कागदपत्रांसह पाच बांगलादेशी नागरिकांना अटक
  2. Bangladeshi Arrested : बोरिवलीतून दोन बांगलादेशी नागरिकांना अटक; अँटिटेररिझम सेलची मोठी कारवाई
  3. अर्नाळ्यात २३ बांगलादेशी नागरिकांना अटक, एका अल्पवयीन मुलाचा समावेश

ABOUT THE AUTHOR

...view details