मुंबई - कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईत कोरोनाचे नव्याने 475 रुग्ण आढळून आले असून, 26 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 6457 वर तर मृतांचा आकडा 270 वर पोहचला आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
मुंबईत कोरोनाचे 475 नवे रुग्ण; 26 जणांचा मृत्यू तर एकूण रुग्णांची संख्या 6457 वर - mumbai covid 19
मुंबईमध्ये कोरोनाचे 475 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी गेल्या 24 तासात 305 रुग्ण आढळून आले आहेत. तर 26 व 27 एप्रिल रोजी खासगी लॅबमध्ये करण्यात आलेल्या टेस्टमधील 170 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. मुंबईत 26 जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईमध्ये कोरोनाचे 475 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी गेल्या 24 तासात 305 रुग्ण आढळून आले आहेत. तर 26 व 27 एप्रिल रोजी खासगी लॅबमध्ये करण्यात आलेल्या टेस्टमधील 170 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. मुंबईत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात 16 जणांचा मृत्यू गेल्या 124 तासात झाला आहे. तर 10 जणांचा मृत्यू मागील आठवड्यात झाला आहे. त्यांचा मृत्यू कोरोनामुळेच झाला आहे याचा अहवाल येणे बाकी होता. याबाबतचा अहवाल आल्याने त्या 10 मृत्यूचा समावेश आजच्या आकडेवारीत करण्यात आला आहे.
एकूण 26 मृत्यूपैकी 16 जणांना दिर्घकालीन आजार होते. मुंबईमधून गेल्या 24 तासात 193 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत 1427 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.