मुंबई- जागतिक दर्जाच्या मुंबई शहरात आगी लागणे, घर इमारत पडणे, नाल्यात समुद्रात बुडणे आदी दुर्घटना घडतात. अशा दुर्घटना घडल्यावर आग विझविणे व बचाव कार्यासाठी मुंबई अग्निशमन दलाला पाचारण केले जाते. 2016-17 ते 2018-19 या गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत तब्बल 47 हजार 425 तक्रारींची नोंद झाली आहे. तीन वर्षांच्या कालावधीत 2018-19 मध्ये तक्रारींच्या संख्येत वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
मुंबई अग्निशमन दलाकडे 2016-17 ते 2018-19 या तीन वर्षाच्या कालावधी 47 हजार 425 तक्रारीची नोंद झाली असून त्यात 2016-17 मध्ये 15 हजार 704, 2017-18 मध्ये 15 हजार 361 तर 2018-19 मध्ये 16 हजार 360 तक्रारीची नोंद झाली. मागील तीन वर्षात आगीबाबत 15 हजार 139, इतर 13 हजार 564, बचाव कार्याबाबत 17 हजार 529, घर पडण्याबाबत 984, चांगल्या उद्देशाने केलेले तक्रारी 144, चुकीच्या उद्देशाने केलेले 59 तर नादुरुस्त फायर अलार्मबाबत 6 तक्रारीची नोंद झाली. 2018-19 या वर्षात तक्रारीच्या संख्येत वाढ झाली. यावर्षी 16 हजार 360 तक्रारीची नोंद झाली आहे. त्यापैकी आगीबाबत 5 हजार 427, इतर 4 हजार 179, बचाव कार्याबाबत 6 हजार 332, घर पडण्याबाबत 336, चांगल्या उद्देशाने केलेले तक्रारी 50, चुकीच्या उद्देशाने केलेले 36 तक्रारीची नोंद झाली.
हेही वाचा - देवनार, मालाड, महालक्ष्मी येथे पालिका प्राण्यांसाठी दहनभट्ट्या उभारणार