महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात आज नवीन ४६६ रुग्णांची नोंद, ९ रुग्णांचा मृत्यू; कोरोनाबाधितांचा आकडा ४६६६

राज्यात नवीन ४६६ रुग्णांची नोंद झाली असून आज ९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये मुंबईच्या ७ तर मालेगाव येथील २ रुग्णांचा समावेश आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ४६६६ वर पोहोचला आहे, तर ६५ रुग्णांना उपचाराअंती डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यात आज नवीन ४६६ रुग्णांची नोंद, ९ रुग्णांचा मृत्यू; कोरोनाबाधितांचा आकडा ४६६६
राज्यात आज नवीन ४६६ रुग्णांची नोंद, ९ रुग्णांचा मृत्यू; कोरोनाबाधितांचा आकडा ४६६६

By

Published : Apr 20, 2020, 9:03 PM IST

मुंबई- कोरोनाचा कहर सुरूच आहे. आज राज्यात नवीन ४६६ रुग्णांची नोंद झाली असून आज ९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये मुंबईच्या ७ तर मालेगाव येथील २ रुग्णांचा समावेश आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ४६६६ वर पोहोचला आहे, तर ६५ रुग्णांना उपचाराअंती डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत एकूण ५७२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

सध्या राज्यात ९३ हजार ६५५ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ६ हजार ८७९ लोक संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ७६,०९२ नमुन्यांपैकी ७१,६११ जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत तर ४६६६ जण पॉझिटिव्ह आले आहेत, असे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

रुग्णांच्या विश्लेषणातून समोर आलेल्या बाबी -

राज्यातील २३३६ रुग्णांचे विश्लेषण केले असता त्यापैकी १८९० (८१ टक्के) रुग्ण हे लक्षणविरहित आहेत, तर ३९३ रुग्णांना (१७ टक्के) लक्षणे असल्याचे आढळून आले आहे. या रुग्णांपैकी ५३ रुग्ण (२ टक्के) हे अतिदक्षता विभागात भरती आहेत, असे आरोग्य खात्याकडून सांगण्यात आले.

क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना -

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अमंलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ३६४ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ५६४८ सर्व्हेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी २१.८५ लाख लोकसंख्येचे सर्व्हेक्षण केले असल्याची माहिती आरोग्य विभागाने जारी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details