महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विविध कंपन्यांकडून मुंबई पालिकेला 46 रुग्णवाहिका भेट, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण - अॅम्ब्युलन्स न्यूज भेट

रुग्णांना दिलासा देण्यासाठी आज विविध कंपन्यांकडून मुंबई महापालिकेला 46 अॅम्ब्युलन्स देण्यात आल्या. या अॅम्ब्युलन्सचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

46 ambulances to Mumbai Municipal Corporation from various companies
विविध कंपन्यांकडून मुंबई पालिकेला 46 अॅम्ब्युलन्स भेट

By

Published : Jun 14, 2020, 8:08 PM IST

Updated : Jun 14, 2020, 8:33 PM IST

मुंबई -मुंबईत अॅम्ब्युलन्स नसल्याच्या तक्रारी कोरोना रुग्णांकडून केल्या जात आहेत. त्यामुळे रुग्णांना दिलासा देण्यासाठी आज विविध कंपन्यांकडून मुंबई महापालिकेला 46 अॅम्ब्युलन्स देण्यात आल्या. या अॅम्ब्युलन्सचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. अशा दात्यांमुळे कोरोनावर नक्कीच मात करू, अशी प्रतिक्रिया महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

विविध कंपन्यांकडून मुंबई पालिकेला 46 रुग्णवाहिका भेट, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबईत 3 हजाराहून अधिक अॅम्ब्युलन्स आहेत. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना 108 च्या व पालिकेने भाडेतत्त्वावर घेतलेल्या अॅम्ब्युलन्स कार्यरत आहेत. यामुळे कोरोनाच्या रुग्णांना वेळेवर रुग्णालयात पोहोचवणे अशक्य होत आहे. यामुळे काही रुग्णांचा मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे. यावर उपाय म्हणून शिवसेना, झी मीडिया, आदित्य फर्टिलायझर या कंपन्या व राजकीय पक्षांकडून महापालिकेला 45 अॅम्ब्युलन्स देण्यात आल्या. या अॅम्ब्युलन्सचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पालिकेकडे अॅम्ब्युलन्स कमी होत्या. मात्र, मुंबईत अॅम्ब्युलन्सची कमतरता नाही. मात्र, लोकांनी घाबरून त्या बंद केल्या आहेत. यामुळे आज मंत्री एकनाथ शिंदे, झी समूह, दीपक फर्टिलायझरने अॅम्ब्युलन्स दिल्या आहेत. आज मुंबई महाराष्ट्रात दातृत्व करणाऱ्या अनेक संस्था आहेत. नव्याने दाखल झालेल्या अॅम्ब्युलन्समुळे रुग्णांना दिलासा मिळेल. अशा दात्यांमुळे कोरोनावर नक्कीच मात करू अशी प्रतिक्रिया महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

Last Updated : Jun 14, 2020, 8:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details