मुंबई - मुंबईमध्ये दररोज 600 ते 700 पेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत होते. त्या प्रमाणात आज काहीशी घसरण झाली आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 426 रुग्ण आढळून आल्याने मुंबईमधील कोरोना रुग्णांचा आकडा 14 हजार 781 वर पोहचल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत घसरण; आज 426 नवीन रुग्णांची नोंद, तर एकूण आकडा 14781वर - mumbai corona update
मुंबईमधून आज 203 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईमधून आतापर्यंत 3 हजार 313 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
![मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत घसरण; आज 426 नवीन रुग्णांची नोंद, तर एकूण आकडा 14781वर covid 19 patient](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7172834-852-7172834-1589300419276.jpg)
मुंबईमधील कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी झाली असताना मृतांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ झाली आहे. मुंबईत 20 ते 25 मृत्यू रोज होत होते. त्यात वाढ होऊन गेल्या 24 तासात 28 जणांचा मृत्यू झाला आहे. 28 पैकी 17 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. 28 मृतांपैकी 17 पुरुष तर 11 महिला रुग्ण होते. 28 मृतांपैकी 4 जणांचे वय 40 वर्षाच्या खाली, 10 जणांचे वय 60 वर्षाच्या वर तर 14 जणांचे वय 40 ते 60 वर्षादरम्यान होते. मुंबईमधून आज 203 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईमधून आतापर्यंत 3 हजार 313 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.