महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात सलग पाचव्या दिवशी कोरोनामुक्त जास्त तर रुग्णसंख्येत घट; 42 हजार 582 नव्या रुग्णांची नोंद - Corona patient discharge figure

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढू लागला आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात आज एकाच दिवशी 54 हजार 535 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत राज्यात 46 लाख 54 हजार 731 जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर दुसरीकडे 42 हजार 582 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत 52 लाख 69 हजार 292 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

Corona Review maharashtra
कोरोना आढावा महाराष्ट्र

By

Published : May 13, 2021, 10:30 PM IST

Updated : May 13, 2021, 10:38 PM IST

मुंबई -राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची नवीन लागण झालेल्या रुग्णांच्यापेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या जास्त येत आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात आज एकाच दिवशी 54 हजार 535 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत राज्यात 46 लाख 54 हजार 731 जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर दुसरीकडे 42 हजार 582 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत 52 लाख 69 हजार 292 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. असे असले तरी या तिसऱ्या लाटेमध्ये रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे आपल्याला दिसून येते. राज्यात एकाच दिवसात 850 रुग्णांनी उपचारादरम्यान आपले प्राण गमावले.

हेही वाचा -मुंबईत 1 हजार 946 नवे कोरोनाग्रस्त, 68 रुग्णांचा मृत्यू

राज्यातील कोरोनाची स्थिती

राज्यात 24 तासांत 850 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूदर 1.5 टक्के एवढा आहे. राज्यात एकूण सक्रिय रुग्ण 5 लाख 33 हजार 294 इतके आहेत.

राज्यात कोणत्या भागात सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद

मुंबई महानगरपालिका- 1952
ठाणे- 473
ठाणे मनपा- 342
नवी मुंबई- 207
कल्याण डोंबिवली- 611
मीराभाईंदर-218
पालघर-421
वसई विरार मनपा- 714
रायगड-732
पनवेल मनपा-213
नाशिक- 1469
नाशिक मनपा- 1312
अहमदनगर- 2370
अहमदनगर मनपा- 255
धुळे- 158
जळगाव 575
नंदुरबार-119
पुणे- 4050
पुणे मनपा- 2451
पिंपरी चिंचवड- 2427
सोलापूर- 1569
सोलापूर मनपा- 125
सातारा - 1997
कोल्हापूर - 1144
कोल्हापूर मनपा - 362
सांगली - 1229
सिंधुदुर्ग - 595
रत्नागिरी - 903
औरंगाबाद - 554
औरंगाबाद मनपा - 229
जालना - 515
परभणी - 410
लातूर - 517
लातूर मनपा - 89
उस्मानाबाद- 551
बीड - 1018
नांदेड - 203
अकोला - 162
अमरावती मनपा- 132
अमरावती - 610
यवतमाळ- 744
बुलडाणा- 1847
वाशिम - 137
नागपूर- 949
नागपूर मनपा- 1286
वर्धा- 630
भंडारा- 222
गोंदिया- 258
चंद्रपूर- 699
चंद्रपूर मनपा- 198
गडचिरोली- 410

हेही वाचा -अखेर दहावीच्या परीक्षा रद्द, पुढील वर्षात मिळणार विद्यार्थ्यांना प्रवेश - अध्यादेश जारी

Last Updated : May 13, 2021, 10:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details